रयत सेवकांनी केली1 लाख 51 हजार आरोळे कोव्हीड सेंटरला मदत.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

रयत सेवकांनी केली1 लाख 51 हजार आरोळे कोव्हीड सेंटरला मदत....

 रयत सेवकांनी केली1 लाख 51 हजार आरोळे कोव्हीड सेंटरला मदत.... 

आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते आरोळे हॉस्पिटल यांच्याकडे सुपूर्त.नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

जामखेड - अडचणीच्या काळात शिक्षक नेहमीच मदत करतात. कोरोणाच्या संसर्ग काळात जामखेड तालुक्यातील रयतचे प्राचार्य -शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एक लाख  एकावन्न हजार या कोव्हीड मदत  निधी जमा केला याचा  उपयोग गोर- गरीब जनतेसाठी  होणार आहे. असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 62 वी पुण्यतिथी निमित्त मदत निधी संकल्प करून एक लाख एकावन्न हजार रुपये मदत जमा करून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार यांच्या हस्ते डॉक्टर रविदादा आरोळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

   या वेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे,पो नि संभाजी गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ संजय वाघ, डॉ सुनील बोराडे,सुलताना शेख, कोकणी साहेब, जामखेड रयत गट प्रमुख प्राचार्य  भगवान मडके ,प्राचार्य सोमनाथ उगले,मुख्याध्यापिका चौधरी के डी, प्राचार्य रमेश वराट, प्राचार्य गरड ए एस,मुख्याध्यापक कल्याण वायकर,नरसेवक महेश निमोणकर,उद्योजक रमेश आजबे , प्रा.रमेश बोलभट,एनसीसी प्रमुख मयुर भोसले,दिलीप ढवळे, हनुमंत नागरे,सतीश टेकाळे, बी एस शिंदे ,तुकाराम लोहार , बापूराव विधाते , प्रा घुमारे,अमित गंभीर व रयत सेवक उपस्थित होते.

       रयत सेवकांनी जमा केलेले मदतीचा  योग्य उपयोग आरोग्यसेवेसाठी होणार आहे तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी  अभिनंदन करून आभार मानले. आरोळे हॉस्पिटल कोव्हीड सेंटरचे संचालक रविदादा आरोळे  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here