आ. लंके यांच्या कोव्हिड सेंटरवर मदतीची खैरात : लंके यांच्या सेवाभावावर शिक्कामोर्तब ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 12, 2021

आ. लंके यांच्या कोव्हिड सेंटरवर मदतीची खैरात : लंके यांच्या सेवाभावावर शिक्कामोर्तब !

 देशविदेशातून सव्वा कोटी रोख, मावळातला तांदूळ आणि कोकणातला हापूस ! 

आ. लंके यांच्या कोव्हिड सेंटरवर मदतीची खैरात : लंके यांच्या सेवाभावावर शिक्कामोर्तब !



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी -   

कोरोनाच्या वैश्‍विक महामारीत गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रात्रंदिवस रूग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देशविदेशातील नागरीकांनी शिक्कामोर्तब केले आहे ! आ. लंके यांनी कोरोना बाधित रूणांसाठी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरासाठी देशविदेशातून तब्बल सव्वा कोटींची रोख मदत जमा झाली असून माळवातील नागरीकांना तांदूळ तर कोकणवासीयांनी रूग्णांसाठी हापूस आंबे पाठविले आहेत ! 

१४ एप्रिल रोजी आ. लंके यांनी भाळवणी येथील नागेेश्‍वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. त्याच दिवशी लंके समर्थकांसाठी शासकिय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सुमारे विस लाख रूपयांची मदत घोषीत करून लंके यांच्या या निर्णयास ठोस समर्थन दिले. दुसऱ्या दिवशीपासून तालुक्यासह तालुक्याबाहेरून मदतीचा ओघ सुरू झाला. कोणी भाजीपाला, कोणी फळे तर कोणी धान्याची पोती भाळवणी येथील आरोग्य मंदीरात आणूण टाकली. रूग्णांसाठी अंडी, सुकामेवा आदींचही रिघ लागू लागली. धान्याची तर रास लागल्याने आता धान्य पाठवू नका इतर आवष्यक मदत पाठवा असे सांगण्याची वेळ आली. प्रशासनाकडून रूग्णांसाठी औषधे देण्यात येत आहेत. मात्र पुरवठा अपुरा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लाखो रूपयांची औषधे काही तासात जमा झाली ! आजूनही होत आहेत. 

आ. लंके यांच्या या सेवाभावी कामाची किर्ती सोशल मिडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार गेली. राज्यपातळीवरील वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांनीही आ. लंके यांच्या या कामाची ठळक दखल घेतली. त्यानंतर देश विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला. केवळ लंके यांच्या सेवाभावावर फिदा होउन पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, कॅनडा  आदी देशांमधून थेट आ. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या खात्यावर रोख रक्कम जमा होऊ लागली. देश विदेशातील मदतीचा ओघ दिवसेंंदिवस वाढतच असून राज्याच्या जवळपास सर्वच जिल्हयांमधून मदत जमा होत आहे. 

कोकणवासीयांनाही आ. लंके यांची भुरळ ! 

आ. लंके यांचा करिष्मा दुरचित्रवाहिणी तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहिल्यानंतर कोकणातील तरूणांनी थेट आ.लंके यांच्याशी संपर्क साधून रूग्णांसाठी खास हापूस आंबे तसेच कोकणी तांदूळ पाठवित असल्याचे सांगितले. व ते भाळवणीच्या आरोग्य मंदीरात पोहच देखील केले. आ. लंके यांंनी कोकणास भेट देण्याची गळही तरूणांनी घातली मात्र कोरोना महामारीच्या नयनाट केल्यानंतर नक्कीच कोकणात येईल अशी ग्वाही आ लंके यांनी दिली.


चिमुरडे, अंगणवाडी सेविका, विधवा परित्यक्त्या ही आल्या धावून !

आ. लंके यांची क्रेझ कोणत्या वर्गात नाही ? चिमुरडयांपासून वृद्धांपर्यंत आ.लंके हे सर्वांना त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावामुळे हवेहवेसे वाटतात. त्यामुळेच मतदारसंघातील अनेक चिमुरडयांनी बचत बँकेत साठविलेले, सायकलसाठी साठविलेले पैसे 'आमदार मामाच्या' सेवाभावी कार्यासाठी सुपूर्द केले. अंगणवाडी सेविका, विधवा तसेच परित्यक्त्यांनीही नेहमी मदतीला धावून येणाऱ्या भावाच्या या कामासाठी शक्य होईल तेवढा हातभार लावला आहे. 

मतदार संघातील नागरीक, कार्यकर्त्यांचेही मोलाचे योगदान ! सेवा कार्यामुळे देशविदेशात लौकिक मिळविलेल्या आमदाराच्या मतदारसंघातील नागरीक तरी मदतीसाठी कसे मागे राहतील ? मतदारसंघातील हजारो नागरीकांनी आपआपल्या परीने वस्तू तसेच रोख रकमेच्या स्वरूपात आ. लंके यांना भरभरून मदत दिली आहे. मदतीचा ओघ सुरूच आहे. आ. लंके यांच्या कार्यकर्त्यांनीही लंके यांच्या या महान कामासाठी लाखो रूपयांची मदत सुपूर्द केली आहे.

No comments:

Post a Comment