पिंपरखेड हसनाबाद येथील नागरिकांनी व मंगेश दादा आजबे यांनी डॉ. रवि दादा अरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिला किराणा व रोख रक्कम.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

पिंपरखेड हसनाबाद येथील नागरिकांनी व मंगेश दादा आजबे यांनी डॉ. रवि दादा अरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिला किराणा व रोख रक्कम....

 पिंपरखेड हसनाबाद येथील नागरिकांनी व मंगेश दादा आजबे यांनी डॉ. रवि दादा अरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिला किराणा व रोख रक्कम.... 



नगरी दवंडी

जामखेड -आज दिनांक 11/5/ 2021 वार मंगळवार रोजी समाजभूषण डॉक्टर रविदादा आरोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, श्री मंगेश दादा आजबे यांच्या प्रेरणेने व जामखेड पोलिस स्टेशनचे पीआय श्री संभाजीराव गायकवाड साहेब यांच्या हस्ते पिंपरखेड हसणाबाद येथील नागरिकांनी जमा केलेले 11 तेल डबे, 25 कट्टे ( गहू,तांदूळ,ज्वारी, बाजरी),50 लिटर दूध, 5 तेल पिशव्या,4 कट्टे वांगे आणि रोख रक्कम 21000 रुपये ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड येथील सुलतान शेख मॅडम यांच्याकडे सुपूर्त केली......... हाळगाव, पिंपरखेड हसनाबाद या परिसरामध्ये कोरोणा विषाणूचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने पिंपरखेड येथील श्री राहुल पवार,श्री संजय ढोले व श्री बंडू सातपुते या तरुणांनी संकल्प करून दिनांक 8,9 व 10 मे 2021 या कालावधीमध्ये आदरणीय तहसीलदार साहेब श्री विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम हाती घेतली व त्यास ग्रामपंचायत सदस्य,युवकांनी व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. जनजागृती करत असताना नागरिकांनी वरील प्रकारची मदत डॉक्टर रविदादा आरोळे यांच्या हॉस्पिटलसाठी दिली. डॉक्टर रविदादा आरोळे हे समाजसेवेच्या भावनेने कोरोणा रुग्णांची सेवा निशुल्क करत असून त्यांना छोटासा हातभार लावण्यासाठी जामखेड व परिसरातील समाजसेवक पुढे येत आहेत. आज दिनांक -11/5/2021 वार मंगळवार रोजी समाजभूषण डॉक्टर रवी दादा आरोळे यांचा वाढदिवस असून त्याच वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरखेड हसणाबाद परिसरातील नागरिकांनी जमा केलेली मदत आरोळे हॉस्पिटलच्या सुलताना शेख मॅडम यांच्याकडे सुपूर्त केली...... त्याप्रसंगी उपस्थित जामखेड पोलिस स्टेशनचे पीआय श्री संभाजीराव गायकवाड साहेब, स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष श्री मंगेश दादा आजबे, स्वाभिमानी शेतकरी पक्ष युवक अध्यक्ष श्री राहुल पवार, पिंपरखेड ग्रा.स.श्री अरुण गाडेकर,पिंपरखेड ग्रा.स.श्री शुभम भापकर, श्री संजय ढोले श्री बंडू सातपुते, श्री बापू शिंदे,श्री महादेव मोरे, इम्रान शेख,श्री कोल्हे सर, श्री भोसले सर, पत्रकार बंधू श्री धनराज पवार ई. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment