खर्डा येथील माजी सरपंच शिवकुमार गुळवे यांनी निवारा बालगृहात केला वाढदिवस साजरा......... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

खर्डा येथील माजी सरपंच शिवकुमार गुळवे यांनी निवारा बालगृहात केला वाढदिवस साजरा.........

 खर्डा येथील माजी सरपंच शिवकुमार गुळवे यांनी निवारा बालगृहात केला वाढदिवस साजरा.........



नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

जामखेड- आज दिनांक 10/ 5 /2021 रोजी खर्डा येथील माजी सरपंच शिवकुमार गुळवे यांनी निवारा बालगृहात  वाढदिवस साजरा करून दिला एक महिन्याचा अन्नधान्य व किराणा,

          ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील 65 मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही हे बालगृह संपूर्णपणे लोकवर्गणीतून चालवले जात आहे,

          खर्डा येथील माजी सरपंच शिवकुमार गुळवे यांनी या अनाथ निराधाराची तळमळ जाणून  स्वतःचा वाढदिवसाचा इतर ठिकाणी होणारा खर्च टाळून तो अनाथ, निराधारांना एक महिन्याचा अन्नधान्य व किराणाच्या स्वरूपात देण्यात आला,

       शिवकुमार नाना गुळवे बोलताना म्हणाले की जामखेड तालुक्यामध्ये देखील अनाथांचा बाप जन्माला आला आहे, तो म्हणजे अॅड. डॉ.अरुण जाधव यांच्या मुळेच गोरगरीब कष्टकरी अनाथ निराधार मुलांना पाटी आणि पेन्सिल ची ओळख निर्माण झाले आहे या बालगृहाच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या व या अनाथांसाठी तुम्हाला ज्या वेळेस गरज भासेल त्यावेळेस अन्नधान्य व कीराण्याची मदत केली जाईल,

    त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे बालगृहातील मुलांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले, व आलेल्या पाहुण्यांचे  गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, संस्थेची  संपूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी दिली प्रास्ताविक संतोष चव्हाण सर यांनी केले, यावेळी त्यांचे सहकारी पत्रकार दत्तराज पवार, प्रशांत कांबळे, मिलिंद थोरात, व कांतीलाल जाधव यांचे नेहमी निवारा बालगृहातील मुला मुलींकरता मदतीचे सहकार्य असते. निवारा बालगृहाचे यावेळी अधीक्षक वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, सविता शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते व आभार तुकाराम शिंदे यांनी मानले,

No comments:

Post a Comment