माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकारातून जिल्हा बँकेमार्फत खेळते भांडवल कर्ज वाटपाचा निर्णय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकारातून जिल्हा बँकेमार्फत खेळते भांडवल कर्ज वाटपाचा निर्णय

 माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकारातून जिल्हा बँकेमार्फत खेळते भांडवल कर्ज वाटपाचा निर्णय

इतर बँका व पतसंस्था यांच्या कर्जाचा बोजा असताना देखील शेतकऱ्यांना  खेळते भांडवल कर्जाचा लाभ मिळणार - माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले



नगरी दवंडी


अहमदनगर प्रतिनिधी- केंद्र सरकार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  वतीने कोरोना संकट काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज रुपी खेळते भांडवल कर्ज वितरित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. यामधील  नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 4% व्याजाची सवलत मिळाली आहे.माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी शेतकऱ्यांना मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही खेळते भांडवल कर्ज देण्यासाठीचा निर्णय संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना खेळते भांडवल कर्ज वाटपास सुरवात झाली आहे मात्र मागील वर्षी काही शेतकऱ्यांना खेळते भांडवल कर्जाचा लाभ घेता आला नाही यासाठी संचालक मंडळानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले याच्या सूचनेनुसार खेळते भांडवल कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे.शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर बँका व पतसंस्था इत्यादीचा बोजा असतात देखील जिल्हा बँकेच्या खेळते भांडवल कर्जाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. त्यामुळे कोरोना संकट काळामध्ये शेतकऱ्यांच्या हाती जनावरांचा चारा-पाणी इत्यादीसाठी चा प्रश्न मिटण्यास या योजनेचा लाभ होणार आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आव्हान माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

No comments:

Post a Comment