अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त वारूळवाडी येथे फवारणी करून मास्क व सॅनिटायझर वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 5, 2021

अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त वारूळवाडी येथे फवारणी करून मास्क व सॅनिटायझर वाटप

 अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त वारूळवाडी येथे फवारणी करून मास्क व सॅनिटायझर वाटपनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी-नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.तसेच प्रत्येक नागरिकांने मास्क व सॅनिटीजरचा वापर करून ही कोरोनाची लढाई जिंकायची आहे. प्रत्येकाच्या आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले यांचा वाढदिवसा निमित्त मिनीनाथ तरुण मंडळ व वारूळवाडी ग्रामस्थांच्यावतीने गावामध्ये व वाड्या-वस्त्यांवर औषधाची फवारणी करून कोरोना बाबत जनजागृती करून प्रत्येक नागरिकांना मास्क व सॅनिटीजरचे वाटप करण्यात आले असल्याने प्रतिपादन सरपंच नितीन साठे यांनी केले.

नगर तालुक्यातील वारूळवाडी येथे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय यांच्या वाढदिवसानिमित्त मिनीनाथ तरुण मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने औषध फवारणी, मास्क व सॅनिटायजर चे वाटप करण्यात आले यावेळी अनिल खोमणे,अरुण वारुळे,सतिष दुसुंगे,गणपत चव्हाण,अरुण खोमणे,सचिन दुसुंगे,विक्रम मराठे,सुहास साठे,मनोज वारुळे,संदीप वारुळे,सुनील खोमणे,हरिभाऊ वारुळे,दीपक दुसुंगे, संगीत परोडकर, निलेश बागडे,राजू कराळे,रावसाहेब वारुळे,राजू वारुळे,सुरेश वारुळे,दीपक अजबे आदी उपस्थित होते.

             वारूळवाडी येथील युवकांनी एकत्रित येऊन कोरोनाच्या लढाई मध्ये नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी गावामध्ये वाड्या-वस्त्यांवर जाऊन औषध फवारणी केली व नागरिकांमध्ये कोरोनाविषाणू बाबत जनजागृती करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here