अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १०९वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १०९वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १०९वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था स्वभांडवली करणार-अध्यक्ष बाबासाहेब मुदगल



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- सहकार क्षेत्रातील अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला १०९ वर्षाची परंपरा असून,दि.३०मे रोजी ऑनलाइन पद्धतीने झूम ॲपद्वारे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने कलम १४४ व संसर्ग प्रादुर्भाव व प्रसार कलम१८८ लागू केले, अशा परिस्थितीमध्ये सभा घेण्यासाठी शासन आदेश,सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग नुसार झूम ॲपद्वारे सभा संपन्न झाली.भविष्य काळामध्ये पतसंस्थेला स्वभांडवली करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे, सभासदांच्या खात्यावर १४ टक्के लाभांश वाटपला सुरवात केली आहे. त्याच बरोबर कायम ठेवीवर ९% व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्जावरील व्याजदर१६% वरून १३% करण्यात आला आहे.कर्जदार निवारण निधीमधून मयत सभासदांना १ लाख रुपये प्रमाणे २३ मयत सभासदांचे कर्जमाफ करण्यात आले आहे.या सभेमध्ये सभासदांच्या हितासाठी तातडीचे कर्ज पंधरा हजारा वरून वीस हजार करण्यात आले,मयत निधी पाच हजारांवरून दहा हजार करण्यात येणार आहे.सभासदाला दिली जाणारी वैद्यकीय मदती बरोबर सभासदाच्या वैवाहिक जोडीदारास पंचवीस हजारा पर्यत दिली जाणार आहे. याच बरोबर मुला मुलीचे लग्न समारंभासाठी पतसंस्था कन्यादान व सूनमुख योजनाला मंजुरी देण्यात आली. सभासदांसाठी बचत योजना म्हणून, पोस्टाच्या धर्तीवर आवर्ती (RD) सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.तसेच कोविड१९ मध्ये मागील वर्षी मयत झालेल्या चार सभासदांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयेची मदत करण्यात आली,यावर्षीही कोविड मध्ये  काही सभासद दुर्दैवाने मयत झाले आहे.यांच्याही कुटुंबीयांना ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे.तसेच काही सभासदांच्या मागणीनुसार मासिक वर्गणीवर व्यास देण्याबाबतचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात आले.आदींसह सर्वच विषयांना खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी मंजुरी दिली.यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी सभासदांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलीत त्यांच्या प्रश्नांची निरांकर केले.यावेळी पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी उपस्थित होते. यावेळी संचालक मंडळासह सभासद झूम ॲपद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       अ.नगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १०९वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष बाबासाहेब मुदगल.

No comments:

Post a Comment