अर्बन बँकेच्या तोट्यात असणार्‍या, शाखा बंद करणयाचा ठराव संमत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

अर्बन बँकेच्या तोट्यात असणार्‍या, शाखा बंद करणयाचा ठराव संमत.

 अर्बन बँकेच्या तोट्यात असणार्‍या, शाखा बंद करणयाचा ठराव संमत.

शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 21 मे रोजी झालेल्या ठरावा प्रमाणे शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड या तोट्यात असलेल्या अर्बन बॅकेच्या शाखा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. दि 31 ऑगस्ट पर्यत या शाखा बंद करणेत येणार आहेत. बँकेचा सातत्याने वाढत असलेला तोटा कमी करणेचे पार्श्वभूमीवर हा कटू परंतु योग्य निर्णय घेण्यात आला आहे.
रिजर्व बैंकेने सर्व भ्रष्टाचार व नवीन शाखांना होत असलेला तोटा पाहून नवीन शाखांना परवानगी देणे बंद केले व नगर अर्बन बँक मोठ्या लूटमारी पासून वाचली परंतु आर्थिक लाभासाठी सुरू करणेत आलेल्या 15 नवीन शाखा पैकी काही अपवाद वगळता बहुतांशी शाखा तोट्यात राहील्या व बँकेचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. ऑगस्ट 2019 मध्ये चेअरमन व संचालक मंडळाची हाकलपट्टी झाली व बँकेवर आलेले प्रशासकांनी तोट्यात असलेल्या शाखा बंद करणेचा निर्णय घेतला. चाकण व सिन्नर शाखा काही महिनेपुर्वी बंद करण्यात आल्या.
2008 ते 2012 या कालावधीत तब्बल 15 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या व यातील दोन चार शाखांचा अपवाद वगळता सर्वच शाखा सुरूवातीपासून तोट्यात आहेत. या शाखांचे उदघाटन कार्यक्रमातील भ्रष्टाचाराचे मुद्दे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. एका शाखेत लाखो रूपयांचा फायदा होतो हे पाहून 2013 मध्ये बँक मल्टीस्टेट करण्यात आली. बँकेच्या 100 नवीन शाखा करून मोठी रक्कम लूटनेचे नियोजन करण्यात आले. बँक लूटने साठी पहिला मोठा डाव टाकणेत आला तो म्हणजे बँकेचे नवीन शाखा उघडणेची चाल. नवीन शाखेसाठी जागा भाड्याने घेणेत आर्थिक फायदा, शाखेचे फर्निचर, लाईट काम, रंगरंगोटी, मध्ये हाथ धुवून घेणे, एका शाखे करिता 7 कर्मचारी नवीन घेता येतात, नवीन शाखेत 500/600 सभासद वाढवायचे म्हणजे पूढील निवडणुकीची पुर्व तयारी, शाखांचे उदघाटन कार्यक्रमात राजकीय स्वार्था बरोबर आर्थिक लाभ करून घेणे या फायद्यांसाठी नविन शाखा उघडण्यात आल्या. बँकेला व्यवसाय किती मिळेल ,बँकेचा फायदा होईल की नुकसान याचा कुठलाही विचार न करता या नवीन शाखा उघडणेचा धडाका लावला होता. आता तोट्यात असलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय प्रशासक घेत आहेत.

No comments:

Post a Comment