आत्महत्येस प्रवृत्त करणारे 3 आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

आत्महत्येस प्रवृत्त करणारे 3 आरोपी गजाआड.

 आत्महत्येस प्रवृत्त करणारे 3 आरोपी गजाआड.

पत्नी माहेरी गेल्याने युवकाची आत्महत्या.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पत्नीस माहेरी पाठविण्यास पतिने नकार दिल्याने त्यास पत्नीचे नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे त्याने राहते घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत रोहित लांडगे यांची आई शिवा बाई यांनी दिल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयताची सासू व पत्नीस या गुन्ह्यात पूर्वीच अटक करण्यात आली पण अन्य 3 फरारी आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

सदर घटनेची हकीकत अशी की, मयत विवाहित युवक रोहित कचरू लांडगे, वय-24 वर्ष, वरवंडी ता. राहुरी याची पत्नी नेहमी माहेरी जात असे व तिला घेण्यासाठी नेहमी छकुल्या बोरुडे रा. डिग्रस ता. राहुरी हा जात होता. दि 15 एप्रिल 2019 रोजी मयत याची सासू बिट्टूुबाई मारुती शिनगारे व छकुल्या बोरुडे हे मयत याचे पत्नीस आणण्यासाठी वरवंडी येथे गेले होते. त्यावेळी मयत रोहित लांडगे याने त्याची सासु बिट्टूबाई मारुती शिंनगारे हीच त्याचे पत्नीस घेण्यासाठी नेहमी छकुल्या बोरुडे हाच का येतो असे म्हणून पत्नीस माहेरी पाठविण्यास नकार दिला. त्यावेळी छकुल्या बोरुडे यांनी त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलावून घेऊन रोहित लांडगे यास मारहाण करून त्याचे पत्नीस डिग्रस येथे घेऊन आले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सकाळी रोहित लांडगे याने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याबाबत मयताची आई शिवाबाई कचरू लांडगे वरवंडी ता. राहुरी यांनी राहुरी पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरून मयताची सासु, पत्नी, छकुल्या बोरुडे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यात मयत याची सासु बिट्टूबाई मारुती शिंनगारे व पत्नी शिवानी रोहित लांडगे यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी छकुल्या बोरूडे व त्याचे इतर साथीदार हे फरार झाले. फरार आरोपी त्यांचा पोलिस अधीक्षक अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली अनील कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने शोध घेत असताना पोनि/अनिल कटके यांना माहिती मिळाली की फरार आरोपी छकुल्या बोरुडे व त्याचे साथीदार हे पाईपलाईन हडको परिसरात आले असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील गणेश इंगळे, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, लक्ष्मन खोकले, मच्छिंद्र, मपोना/ भाग्यश्री भिटे अशांनी मिळून पाईप लाईन हाडको परिसरामध्ये जाऊन मिळालेल्या माहितीवरून आरोपींचा शोध घेऊन आरोपी छकुल्या उर्फ सतीश रावसाहेब बोरुडे वय 19 वर्ष रा.डिग्रस ता.राहुरी अमीर शेख वय 31 वर्ष रा.सदर, सीमा रावसाहेब बोरुडे रा.सदर यांना ताब्यात घेऊन राहुरी पो.स्टे ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही राहुरी पो.स्टे करीत आहेत.
ही कारवाई मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक, अहमदनगर, दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीरामपूर विभाग अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment