रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केडगावला युवकांचे रक्तदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केडगावला युवकांचे रक्तदान

 रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केडगावला युवकांचे रक्तदान

जय बजरंग प्रतिष्ठान व भाऊ कोतकर मित्र मंडळाचा उपक्रमनगरी दवंडी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जय बजरंग प्रतिष्ठान व भाऊ कोतकर मित्र मंडळाच्या वतीने केडगाव शिवाजीनगर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.

या शिबीराचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे आजी-माजी सभापती अविनाश घुले व मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. प्रतिक कोतकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या सर्व खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या शिबीराप्रसंगी अशोक कराळे, रमेश कोतकर, माउली जाधव, भूषण गुंड, सोनू घेंबुड, सागर सातपुते, सौरभ जपकर, सुधीर कार्ले, मनोज पवार, सोमा तांबे, संजू बोरुडे, मोहन काळे, अमित जाधव, मुन्ना कराळे, आनंद मांढरे, श्रीपाद सुरसे, विजय तेलोरे, सुरज खताडे, गौरव नागापुरे, शुभम आजबे, मनी रासने, सचिन जपकर, विशाल गीते, सागर बालवे, सूनील भांड, पप्पू आंधळे, समर्थ जपकर, कृष्णा काळे आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18 ते 45 वयो गटातील युवक-युवतींचे कोरोना लसीकरण होत आहे. ही लस घेतल्यानंतर सुमारे 60 दिवस रक्तदान करता येत नसल्याने युवकांनी रक्तदान करुन लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले.

युवकांनी गरजूंना जीवदान मिळण्यासाठी पुण्याचे काम केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असून, ते भरुन काढणे गरजेचे आहे. रक्तदान ही काळाची गरज बनली असून, सामाजिक बांधिलकी ठेऊन प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज आहे. तर कोरोना आजार बरे झालेल्यांनी प्लाझमा दान करुन इतरांना जीवदान द्यावे. या कोरोच्या बिकट परिस्थितीशी लढताना माणुसकीच्या भावनेने सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचे आवाहन त्यांनी केले. या शिबीरास अहमदनगर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. या शिबीरात शंभरपेशा जास्त युवकांनी रक्तदान केले. यावेळी कामरगाव येथील आकाश ठोकळ मित्रपरिवारचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. रक्तदान करणार्‍या युवकांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment