डॉक्टर म्हणाले.. मला उपचारासाठी वेळ नाही ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

डॉक्टर म्हणाले.. मला उपचारासाठी वेळ नाही !

 डॉक्टर म्हणाले.. मला उपचारासाठी वेळ नाही !

जिल्हाधिकार्‍यांकडे उपाध्ये कुटुंबियांची डॉक्टरांवर कारवाईची मागणी..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सारसनगर येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड केल्याचा आरोप उपाध्ये कुटुंबाने केला आहे. या बाबत उपाध्ये कुटुंबाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन कारवाईची मागणी ही केली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की सारसनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी उपाध्ये नामक महिलेस दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाला उपचार देण्यासाठी डॉक्टरकडे वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्ये यांच्या मुलाने आपली आई हिला एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णाकडे लक्ष देण्या ऐवजी सरळ माझ्याकडे वेळ नसल्याचे सांगितले.
डॉक्टरांचा आरोग्य सेवेचा धर्म असतानाही त्यांनी वेळेवर उपचार देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी आपला धर्म पाळला नाही, यानंतर चार तासांनी त्यांनी आरोग्य सेविकेला पाठवून तुमचे पेशंटवर आम्ही उपचार करु शकत नाही तुम्ही तुमचे पेशंट उपचारासाठी दुसरीकडे घेऊन जा असे सांगितले. उपचारा अभावी पेशंट डॉक्टरांनी बाहेर काढले. डॉक्टरांनी गैरवागून दिली असून या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना उपाध्ये कुटुंबाने दिलेल्या निवेदनात केली आहेे. तसेच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणाची शहानीशा करुन डॉक्टरांच्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment