डॉक्टरला मारहाण, तोडफोड.
मयत रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णालयात राडा.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने स्वतः ऑक्सिजन पाईप काढल्यामुळे मृत्यू झाला. या मृत्यूला डॉक्टरला जबाबदार धरून मयत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करून रात्री एक वाजता तुफान राडा केला. रुग्णालयातील सामग्रीची ही तोडफोड केली.. तारकपूर मधील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये ही घटना घडली. डॉक्टरांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे.
कोरोनाचे थैमान सुरु आहे. काही डॉक्टर त्यांच्या परीने सर्वोत्तम असे काम करत आहेत मात्र तरीही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला 72 वर्षीय करोना रुग्णावर उपचार सुरु होते. मात्र सदर रुग्ण ऑक्सिजन पाइप वारंवार काढून टाकत असे.गुरुवारी रात्रीही त्याने ऑक्सिजन पाइप काढून टाकला. त्यामुळे प्रकृती खालावली आणि दुर्दैवाने काही वेळातच त्याचा मृत्यूही झाला. दरम्यान रुग्ण मृत झाल्याची ही माहिती आयसीयूमध्ये काम करणार्या डॉक्टरांनी बाहेर जाऊन नातेवाईकांनी कळविली.
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि अन्य कर्मचार्यांवर हल्ला चढविला. त्यांना मारहाण केली आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली. आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर राहुल अरूण ठोकळ (वय24 रा. सारोळा कासार, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपींनी त्यांच्यासह प्रवीण गायकर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सविस्तर असे कि डॉ. ठोकळ यांनी रुग्णाचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांचा मुलगा पंकज तानाज गडाख (वय 30) व त्याचा मावस भाऊ रोहन बाबासाहेब पवार (वय 21, दोघे रा. टाकळ काझी, नगर) यांना दिली.
No comments:
Post a Comment