नगरचे हॉटेल उद्योग समुहाचे संस्थापक व उपनगराध्यक्ष रावसाहेब सिताराम बोरुडे यांचे निधन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

नगरचे हॉटेल उद्योग समुहाचे संस्थापक व उपनगराध्यक्ष रावसाहेब सिताराम बोरुडे यांचे निधन.

 नगरचे हॉटेल उद्योग समुहाचे संस्थापक व उपनगराध्यक्ष रावसाहेब सिताराम बोरुडे यांचे निधन.



नगरी दवंडी

अहमदनगर - नगर मध्ये हॉटेल इंडस्ट्रीजचा शुभारंभ करून आज स्वतःचे 12 हॉटेल पंचशील,पंचरत्न विजय ,पुष्कराज,परिचय इप्रेरियल अशी  हॉटेल उभारलेल्या उद्योग समुहाचे संस्थापक मा रावसाहेब बोरुडे यांचे आज दि 25 में 2021 रोजी दीर्घ आजराने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 80 होते. त्यांचे पाठीमागे पत्नी, 2 मुले, 2 मुली नातवंडे, बधू, भावजयी असा परिवार आहे. त्यांचे शिक्षण जूनी एस एस सी मुळे पोलिस खात्यात हवालदार म्हणून नोकरी केली. परंतु नगरशहर स्वतः शेती शहरालगत नोकरीत मन रमेना म्हणुन त्यांनी उद्योग व्यवसाय करावा असे सातत्याने मनात येत होते. 7 भाऊ, भावजयी यांची उत्तम साथ होती. त्यामुळेच त्यांनी नगर शहरात प्रथम हॉटेल सुरु करुन उत्तम गुणवत्ता आणि सर्व्हिस दिली. ती लोकांना खुप आवडली. त्यातून त्यांनी एकापाठी मागे एक असे 12 हॉटेल आज नगर शहरात उत्तम उभारलेले आहे. त्यांनी हा व्यवसास करत असताना सामाजिक कार्यात ही अग्रेसर राहिले .माजी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे यांचे ते चुलते होते.

No comments:

Post a Comment