कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयामधून अतिरिक्त बिलातून होणारी लूट थांबवण्यासाठी युवक काँग्रेसचा पुढाकार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 5, 2021

कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयामधून अतिरिक्त बिलातून होणारी लूट थांबवण्यासाठी युवक काँग्रेसचा पुढाकार

 कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयामधून अतिरिक्त बिलातून होणारी लूट थांबवण्यासाठी युवक काँग्रेसचा पुढाकारनगरी दवंडी

अहमदनगर( प्रतिनिधी) कोरोना या संकटात सर्व डॉक्टर, मेडिकल विभागातील विविध कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे .मात्र काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोणा रुग्णांची अतिरिक्त बिलातून लूट होत आहे ती लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने एल्गार आंदोलन पुकारले असून कोरोणा रुग्णांना मदतीचा हात दिला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की , मे 2020 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश काढून राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये 80 टक्के कोटा अंतर्गत स्वतःच्या ताब्यात घेतली .या रुग्णालयांमधून दाखल झालेले कोरोना रुग्णांची तपासणी व उपचार फी ही सर्व  शासकीय नियमानुसार ठरवून देण्यात आली .मात्र तरीही काही ठिकाणचे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स हे अतिरिक्त बिल दाखवून कोरोणा रुग्णांची लूट करत आहे .यामध्ये नर्सिंग चार्ज, डॉक्टर व्हिजिट, बायोमेडिकल वेस्ट, स्पेशलिटी असे वेगळे कारण दाखवून अतिरिक्त बिल वाढवले जात आहे. यामुळे अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या कोरोणा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप होत आहे .

याबाबत या चुकीच्या पायंडयाबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने अध्यादेश काढून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिका क्षेत्रात विविध कर्मचारी पाठवून बिलाची ऑडिट करण्याची सूचना केली आहे .त्यानुसार काम होत आहे .परंतु आता त्यांच्या मदतीला महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवक काँग्रेस उतरली असून

ज्यांची अतिरिक्त बिल आले असेल त्यांनी तातडीने आपल्या जवळच्या विधानसभा युवक काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेसशी संपर्क साधावा असे आवाहन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. किंवा अतिरिक्त बिल #SOSMPYC किंवा # SOSIYC यावर पाठवावे  किंवा 9075084591  किंवा 9130098784 या नंबर वर तातडीने संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here