केडगाव केंद्रातील शिक्षकांतर्फे २ कोव्हिड सेंटर व अमरधाम कर्मचाऱ्यांना किराणा व वस्तू वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 5, 2021

केडगाव केंद्रातील शिक्षकांतर्फे २ कोव्हिड सेंटर व अमरधाम कर्मचाऱ्यांना किराणा व वस्तू वाटप

 केडगाव केंद्रातील शिक्षकांतर्फे २ कोव्हिड सेंटर व अमरधाम कर्मचाऱ्यांना किराणा व वस्तू वाटप नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी: - केडगाव मध्ये काही दिवसांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख मा. दिलीप सातपुते यांनी कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. तसेच डॉन बॉस्को येथेही कोव्हिड सेंटर आहे. केडगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्रा. शिक्षकांतर्फे केंद्रप्रमुख दिलीप दहिफळे सर, संतोष गवळी सर व सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे सर यांच्या पुढाकारातून केंद्रातील शिक्षकांनी व महिला शिक्षीकांनी काही मदत जमा केली. त्यातून त्यांनी या कोव्हिड सेंटरला किराणा मदत आज देण्यात आली. यावेळी मा. दिलीप सातपुते, पारुनाथ ढोकळे सर, मनीष ठुबे, सुनील ठुबे, हे उपस्थित होते. तसेच डॉन बॉस्को  व  अमरधाम मधील कर्मचाऱ्यांना  स्वतंत्रपणे  किराण्याचे  किट  देण्यात आले. यावेळी दिलीप सातपुते म्हणाले की केडगाव केंद्रातील शिक्षकांनी सेंटरला किराणा देऊन महत्त्वाचे कार्य केले आहे. आतापर्यंत दोनशे पेशंट आपल्या सेंटर मधून बरे होऊन गेल्याचे दिलीप सातपुते यांनी सांगितले. अमरधाम मधील  कर्मचारी  फार महत्त्वाचे काम करतात - परंतु  ते  दुर्लक्षित घटक आहेत. म्हणून  केडगाव केंद्रातील  शिक्षकांमार्फत  त्यांना व अशा  इतरही कर्मचाऱ्यांना  मदत देण्यात आली. मदतीचा हा पहिला टप्पा होता. दुसऱ्या दिवशी लगेच मेडिकल संबंधित वस्तू देण्यात येणार आहेत. केडगाव मनपा विभागातील सर्व व कोव्हिड सेंटरचे सर्व कर्मचारी, डॉक्टर यांना फेस शील्ड, मास्क व इतर वस्तू देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here