नवी मुंबईत निलेश लंके प्रतिष्ठाणच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 14, 2021

नवी मुंबईत निलेश लंके प्रतिष्ठाणच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन!

 नवी मुंबईत निलेश लंके प्रतिष्ठाणच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :  नवी मुंबई सानपाडा रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स  बी -७ सानपाडा (पूर्व ) येथे  निलेश लंके प्रतिष्ठाण च्या शाखेचे उदघाटन पारनेर नगर तालुका मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले अतिशय सुंदर सोहळा संपन्न झाला . त्यावेळी नानाभाऊ निमसे यांची शाखा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .

        तसेच मुंबई प्रतिष्ठाणच कडून आजवर लाखो रुपयाची मदत भाळवणी येथील आरोग्य मंदीरास देण्यात आली आहे . व या शाखा शुभारंभा प्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईचे जेष्ठ मार्गदर्शक श्री . शंकरशेठ चिकने यांनी एक हात मदतीचा  म्हणून  ११ हजार  रुपयाचे १००१ मास्क कोविड सेंटर साठी आमदार साहेबांकडे सुपूर्द केले . त्यावेळी पारनेर तालुका शिक्षक संघाच्या वतीने श्री आहेर सर,श्री पानमंद सर,श्री पवळे सर, यानी आमदार साहेबाचा छोटासा सन्मान केला .

  सदर कार्यक्रम प्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठाणचे मुंबई सचिव श्री . नितिनदादा चिकने, खजिनदार श्री दिलीपदादा कोरडे ,श्री आबा शेठ मोरे ,श्री आणि सौ .चौगुले , सरपंच श्री अशोक घुले ,श्री राहुल झावरे श्री जितेश सरडे ,श्री दादा दळवी, श्री अमोल धामणे व श्री पिरताजी घुले, श्री विकास खोदडे कीरण जमदाडे ,श्री सुभाषशेठ  वाळुंज, दादासाहेब पडळकर , माऊली भागवत ,युवा सदस्य श्री मयुर चिकने, संदीप निमसे, शुभम आहेर,उध्दव वाफारे,चिन्मय निमसे ,पवन भागवत ,तुषार चिकने ,शुभम गोडसे ,संदेश वाळुंज हजर होते

        श्री भाऊसाहेब आहेर सर यांनी आमदार साहेब आणि उपस्थित सर्वाचे आभार मानले .

No comments:

Post a Comment