हिंदकेसरींनी आ. निलेश लंके ना दिला कोरोना केसरी किताब..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 14, 2021

हिंदकेसरींनी आ. निलेश लंके ना दिला कोरोना केसरी किताब..!

 हिंदकेसरींनी आ. निलेश लंके ना दिला कोरोना केसरी किताब..!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सध्या महाराष्ट्र भर चर्चेमध्ये असलेलेमा.आ. निलेश लंके साहेब यांना कोरोना केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांना अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व एक लाख रुपये चा धनादेश देऊन गौरविण्यात आले.कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये त्यांनी केलेले सेवाकार्य मानवतेच्या दृष्टीने एक अमूल्य उदाहरण आहे.लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक याची योग्य सांगड घालत त्यांनी लोकसेवा सुरू ठेवली आहे.

          एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराने पाहतोय.स्वतः मैदानांत उतरून आपल्या लोकांसाठी कोरोनाशी दोन हात करत खऱ्या अर्थाने पारनेर चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आ.निलेश लंके यांनी कोरोना बरोबर ची कुस्ती चितपट करण्याचे कार्य केलेले आहे.म्हणून हिंदकेसरी फाउंडेशन सुर्ली,कराड च्या वतीने हिंदकेसरी मा.पै.संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा,एक लाख रुपये चा धनादेश,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.व त्यांना कोरोना केसरी हा किताब देण्यात आला.

                 यावेळी मा.श्री.नवनाथ पाटील (भाऊ),सुर्ली गावचे सरपंच मा.श्री.दत्तात्रय वेताळ,समाजसेवक मा.निसार मुल्ला,मा.पै.सोनू मदने,माजी उपसरपंच मा.श्री.कृष्णत मदने हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here