मुंबई कर मंडळ आणि जयवंत शेठ वाळुंज यांच्याकडून काकणेवाडीतील कुटुंबाना किराणा भेट ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

मुंबई कर मंडळ आणि जयवंत शेठ वाळुंज यांच्याकडून काकणेवाडीतील कुटुंबाना किराणा भेट !

 मुंबई कर मंडळ आणि जयवंत शेठ वाळुंज यांच्याकडून काकणेवाडीतील कुटुंबाना किराणा भेट !



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी...

देशभरात आलेली कोरोनाची लाट आणि लॉक डाउन मुळे अनेक कुटुंबाची आज उदर निर्वाहाची समस्या निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत नोकरीं, आणि उदयोग धंद्या मुळे मुंबई स्थित झालेले मुंबईकर, काकणेवाडी ग्रामस्थ च्या मदतीला धावून आले.श्री राम मित्र मंडळ चे अध्यक्ष जयवंत शेठ वाळुंज, खजिनदार नाना साहेब झावरे,उद्योजक दत्तात्रय नवले,सुभाष वाळुंज,हभप दादाभाऊ महाराज आणि रंगनाथ महाराज वाळुंज यांच्या मार्गदर्शन खाली आणि हभप बाळासाहेब रमाजी वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत किराणा वाटप करण्यात आले.

      उदर निर्वाह साठी कुठेही स्थायिक झालो असलो तरी मातृ भूमिविषयी प्रेम आणि ओढ प्रत्येकाच्या मनात असते याचा प्रत्यय वेळो वेळी काकनेवाडी कराना जाणवला.मायभूमी तील जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या  सोडवण्या साठी खजिनदार नाना साहेब झावरे यांच्या विशेष सहकार्याने विहीर खोदून दिली. तसेच मागील दुष्काळात यशस्वी पर्जन्ययज्ञ चे आयोजन करण्यात आले होते. जयवंत शेठ वाळुंज यांच्या सौजण्याने जी.प.प्रा. शाळा येथे शाळे साठी बोरवेल, फिल्टर, डिजिटल शाळे साठी लागणारे साहित्य देण्यात आले होते. तसेच मागील महिन्यात त्यांनी आपल्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५५ हजाराचा किराना कोविड केयर सेंटर भाळवणी येथे भेट देण्यात आला होता.तसेच मुंबकर मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन करण्यात येते.

अडचणीत असणाऱ्या गावकऱ्यांच्या  मदतीसाठी मुंबईकर नेहमी एक पाऊल पुढेच असतात. लॉकडाउन च्या काळात  मोठा आधार दिल्याची भावना या वेळी लाभार्थिनी व्यक्त केली.    लॉक डाउन च्या या पुढील काळात ही मुंबईतील उद्योजकाकडून काकणे वाडीकरासाठी मदत मिळवून देऊ असे आश्वासन अध्यक्ष जयवंत शेठ वाळुंज यांनी दिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब वाळुंज,भगवान वाळुंज,योगेशवाळुंज , विष्णू वाळुंज संभाजी वाळुंज, प्रवीण वाळुंज,राजेंद्र झावरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment