सुजित झावरे यांनी कोरोनाग्रस्तांना दिली श्रीमद्- भगवतगीता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

सुजित झावरे यांनी कोरोनाग्रस्तांना दिली श्रीमद्- भगवतगीता

 सुजित झावरे यांनी कोरोनाग्रस्तांना दिली श्रीमद्- भगवतगीता!

टाकळी ढोकेश्वर येथील कोव्हिड सेंटरवर राबविला अभिनव उपक्रम...

कोरोना काळात एकमेकांना आधार देण्याची गरज : सुजित झावरे
नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

पारनेर तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाचे हे संकट ओळखून तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या सामाजिक विचारांना आदर्श ठेवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी 300 बेड'चे अद्यावत असे कोरोना सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये टाकळीढोकेश्वर परिसरातील जवळपास 100 च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर टाकळी ढोकेश्वर येथे सुजित झावरे पाटील यांनी आज अभिनव उपक्रम राबविला कोरोना बाधित रुग्णांना श्रीमद् भगवतगीता  ग्रंथाचे यावेळी वाटप करण्यात आले. 

 यावेळी पारनेर तालुक्यासाठी आरोग्यदूत ठरलेले व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील युवा नेते सुदेश झावरे पाटील  राजवर्धन झावरे पाटील, मोहन रोकडे, किसन धुमाळ, संजय भोर, किरण   टेकुडे, संदीप खंडागळे आदी यावेळी उपस्थित होते. 

 यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील म्हणाले की कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आपण सर्वांनी या कोरोना काळात एकमेकांना आधार देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment