कोळगाव येथील हॉटेलवर छापा सुमारे 96 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

कोळगाव येथील हॉटेलवर छापा सुमारे 96 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त

 कोळगाव येथील हॉटेलवर छापा

सुमारे 96 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिसांच्या पथकाने कोळगाव हद्दीतील नगर दौंड रस्त्यावर हॉटेल कावेरीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये साठवलेला देशी विदेशी दारुचा साठा पकडला. दारू विक्रीचा परवाना नसताना तब्बल  96000 किमतीचा दारूसाठा जपे करण्यात आला होता तसेच एक महिला आरोपीस अटक करण्यात आली.
अहमदनगर जिल्हयात दारु , जुगार , मटका , करणारे इसमावर कारवाई करणे बाबत विशेष मोहिम चालू असून सदर मोहिमेचे अनुषगाने बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक  संपतराव शिंदे यांनी धंदया बाबत माहिती घेत असतानाच त्यांना गुप्त माहिती मिळाली की , कोळगाव शिवारात नगर दौड रस्त्यावर हॉटेल कावेरीच्या पाठीमागील पत्राच्या शेड मध्ये मोठया प्रमाणात देशी विदेशी दारुची विक्री चालू आहे मोठया प्रमाणात देशी विदेशी दारु मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने पो.नि.संपतराव शिंदे , पो .ना , संतोष गोमासाळे , पोहेकॉ  हसन शेख , पो .ना. ज्ञानेश्वर पठारे , पो.कॉ दिवटे , चालक पो.हे.कॉ . भाऊसाहेब शिंदे ,पो.हे.कॉ. रावसाहेब शिंदे , अविंदा जाधव ,  विदया धावडे आणि दोन पंचासह माहिती ठिकाणी जाऊन कावेरी हॉटेलचे पाठीमागील पत्राच्या शेड मध्य अचानक 12 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता.  हॉटेलमध्ये रोहिणी सतिष घोंडगे रा.घोंडगेवाडी ता.श्रीगोंदा हि दारू विक्री करताना मिळूने आल्याने लागलीच तिला ताब्यात घेत परिसरात पाहणी करून झडती घेतली असता त्या ठिकाणी 96 हजार 300  रु किंमतीची देशी विदेशी दारु मिळून आल्याने दोन पंचा समक्ष जागीच पंचनामा करुन सदरचा मुददेमाल जप्त केला. म.पो.कॉ अविंदा विठठल जाधव यांचे फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आलेला गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना  ज्ञानेश्वर पठारे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment