मजूर संस्थांच्या मजुरांचा विमा उतरवावा : गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

मजूर संस्थांच्या मजुरांचा विमा उतरवावा : गायकवाड

 मजूर संस्थांच्या मजुरांचा विमा उतरवावा : गायकवाड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील मजूर संस्थांना तीन लाखांच्या आतील काम वाटप होत असल्याने व त्यापेक्षाही गेल्या दीड वर्षापासून कोव्हीड 19 मुळे सर्व जगावर ओढावलेल्या संकटांमध्ये मजूर संस्थेचे चेअरमन व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक मजूर संस्थांचे चेअरमन, सभासद व मजुरांचे उपचारा अभावी निधन झाले. त्यामुळे सभासदांचा कोव्हीड 19 विमा उतरवावा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बोर्डाच्या बैठकीत फेडरेशनचे संचालक प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी केली .या मागणीचे निवेदन त्यांनी दिले.
 कृषीभूषण व ज्येष्ठ नेते सबाजीराव गायकवाड यांनी ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे नगर जिल्ह्या तील सर्व मजूर संस्थेचे चेअरमन व मजूर यांच्याशी चर्चा केली. मजुरांना विमा कवच नसल्याने त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याचे यावेळी लक्षात आले. त्यांच्याबाबत माणुसकी भावना  ठेवणे आवश्यक आहे. मजूर आपल्या  परिवाराचाच एक भाग आहे ही भावना . गायकवाड परिवाराने नेहमीच जपली आहे. त्यामुळे संघाने आपल्या सभासदांचा कोव्हीड 19 विमा उतरवावा, अशी सूचना प्रशांत गायकवाड यांनी केली. तसे निवेदन मजूर फेडरेशनचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना दिले आहे. लवकरच सर्व मजूर सभासदांना दोन लाखांपर्यंतचे कोव्हीड- 19 विमा उतरवण्याचे आश्वासन यावेळी गायकवाड यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here