शिक्षक कर्मचार्‍यांची तातडीने पीएफबीडीएस प्रणाली सुरू करा ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

शिक्षक कर्मचार्‍यांची तातडीने पीएफबीडीएस प्रणाली सुरू करा ः गाडगे

 शिक्षक कर्मचार्‍यांची तातडीने पीएफबीडीएस प्रणाली सुरू करा ः गाडगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षके तर कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीसाठी बीडीएस प्रणाली सुरू करण्याची मागणी महाराष्ट राज्य शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली आहे. तसे पत्रच शिक्षक भारती चे आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना दिले असल्याची माहिती शिक्षक  नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मासिक वेतनातून दरमहा 10 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी जमा होते. कर्मचारी आपल्या वैयक्तिक कौटुंबिक गरजेसाठी पीएफ मध्ये जमा असणारी रक्कम काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करतात  गेली दोन महिने शासन स्तरावर आवश्यक असणारी बीडीएस प्रणाली बंद आहे.
अनेक कर्मचार्‍यांची कौटुंबीक अडचण लक्षात घेता  वित्त विभाग मंत्रालय (मुंबई) यांनी  भविष्य निर्वाह निधीसाठी  बीडीएस प्रणाली सुरू करण्याची तसेच कर्मचार्‍यांची अडचण तात्काळ दूर करण्याची मागणी शिक्षक भारतीच्यावतीने शिक्षक नेते सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख. योगेश हराळे. श्रीकांत गाडगे.उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु ,जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे. संभाजी पवार,हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे, संतोष देशमुख . किसन सोनवणे. राजेंद्र  जाधव. सूदर्शन ढगे. संजय पवार. नवनाथ घोरपडे. कैलास जाधव. गोरखनाथ गव्हाणे.  संजय भूसारी. महिला जिल्हाध्यक्ष आशा   मगर. महिला सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, रेवन घंगाळे .जॉन सोनवणे आदीनी केली आहे.

No comments:

Post a Comment