मनपाच्या इतिहासातील पहिलेच ऐतिहासिक आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

मनपाच्या इतिहासातील पहिलेच ऐतिहासिक आंदोलन

 मनपाच्या इतिहासातील पहिलेच ऐतिहासिक  आंदोलन;

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मागणीसाठी किरण काळेंचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मनपात रात्रभर मुक्काम - फेसबुक लाईव्हद्वारे रात्री उशिरा नगरकरांशी साधला संवादनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी : काँग्रेसच्या ऑक्सीजन बेडच्या मागणीसाठी उत्तर नसणारे मनपा आयुक्त शंकर गोरे काल रात्री उशिरापर्यंत अखेर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि पदाधिकारी यांनी देखील चिकाटी सोडली नाही. रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे आणि तोफखाना पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा हा किरण काळे यांची आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नगरकरांची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही मनपा सोडणार नाही अशी परखड भूमिका काळे यांनी घेतल्यामुळे डांगे यांना आवरते घ्यावे लागेल. 

मनपाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडले की कोणत्या तरी नेत्याने रात्रभर चक्क आयुक्तांच्याच दालनासमोर चटई अंथरूण मुक्काम करत आपल्या सहकाऱ्यांसह नगरकरांच्या प्रश्नावर आंदोलन केले आहे. काळे यांच्या भूमिकेमुळे रात्री पासून मनपाच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जनसामान्यांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस आणि किरण काळे धावून आल्यामुळे मनपा प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. 

किरण काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते या आंदोलकांनी मनपामध्ये नगरकरांसाठी मुक्काम ठोकत रात्रभर आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुणी झोपण्यासाठी चटई, पांघरून आणून दिले तर कोणी स्वतःच्या घरून आंदोलकांना जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी आणून दिले. 

रात्री उशिरा किरण काळे आणि आंदोलकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी उभारलेल्या लढ्याबद्दल नगरकरांशी संवाद साधला. शहराचे आ.संग्राम जगताप यांचे नाव न घेता शहरातील परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आंदोलकांना देण्यासाठी कोणतेच ठोस उत्तर आपल्याकडे नसल्यामुळेच आणि आमदारांच्या दबावामुळेच दिवसभर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकण्याची हिम्मत न करू शकलेले मनपा आयुक्त स्वतः येत ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत हा लढा नगरकरांसाठी सुरूच राहील असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.  

तुम्हाला पाहून वडिलांची आठवण झाली - विक्रम अनिल राठोड, ज्येष्ठ नगरसेवक बोराटे यांचाही काळेंना फोन

----------------------------------------

काल रात्री उशिरा युवासेनेचे नेते विक्रम अनिल राठोड यांनी मनोज गुंदेचा यांच्या दूरध्वनीवरून किरण काळे यांच्याशी संवाद साधला. तुमच्या आंदोलनाला पाहून मला माझ्या दिवंगत हिंदू धर्मरक्षक अनिलभैय्या राठोड यांची आठवण झाली. तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी सर्वसामान्य नगरकरांसाठी स्व.भैय्यां प्रमाणेच रस्त्यावरती उतरत झटत आहात. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शिवसेना तुमच्या सोबत आहे, असे यावेळी राठोड यांनी सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी देखील काळे यांना फोन करत आपला लढा नगरकरांच्या रास्त प्रश्नांवर असून मनपाला वठणीवर आणण्यासाठी आपण उचललेले पाऊल योग्यच असल्याचे सांगितले. 

मला काहीही झाले तरी चालेल, पण...

----------------------------------------

किरण काळे म्हणाले की, माझ्या नगर शहरातील सर्वसामान्य लोक, गोरगरीब जनता यांना मनपाच्यावतीने मोफत ऑक्सीजन बेड मिळाले पाहिजेत. रुग्णांना बेड मिळत नाही म्हणून त्यांचे प्राण जात आहेत. हे मनाला वेदना देणार आहे. मला काहीही झाले तरी चालेल, पण सामान्य माणसाचे बेडसाठी हाल झाले नाही पाहिजेत. महापालिकेने माणुसकी, संवेदनशीलपणे वागावे. असे भावनिक उदगार काळे यांनी काढले आहेत.

No comments:

Post a Comment