रेनकोट, छत्री, ताडपत्री इत्यादी पावसाळी वस्तू वितरणास परवानगी मिळावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

रेनकोट, छत्री, ताडपत्री इत्यादी पावसाळी वस्तू वितरणास परवानगी मिळावी

 रेनकोट, छत्री, ताडपत्री इत्यादी पावसाळी वस्तू वितरणास परवानगी मिळावी

अहमदनगर होलसेल व्यापारी कापड, गारमेंटस् व्यापारी असोसिएशनची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहर ही कापडाची राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. यात पावसापासून संरक्षण करणारे रेनकोट, ताडपत्री, छत्री,  प्लास्टिक कागद, शेतकर्यांना लागणारे पावसाळी कपडे, वस्तू याचाही मोठा व्यापार असून अनेक होलसेल विक्रेते नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात रिटेलर्सना माल पुरवतात. यंदा लॉकडाऊनमुळे रिटेलर्सना माल पुरवताना अडचणी येत असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर माल वितरणास परवानगी मिळावी अशी मागणी अहमदनगर अहमदनगर होलसेल व्यापारी कापड, गारमेंटस् व्यापारी असोसिएशनने केली आहे. याबाबत असोसिएशनने जिल्हाधिकारी,  तसेच आ.संग्राम जगताप यांना निवेदन दिले आहे.
असोसिएशनच्यावतीने निखिल गांधी सतिश कुलकर्णी, दीपक कासवा, यांसागर काबरा, नी सदर निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी साधारणत: मे महिन्याच्या सुरुवातीलाच नगरमधील होलसेल व्यापारी सदर पावसाळी वस्तूंचा माल रिटेलर्सना रवाना करतात. मात्र गेल्या वर्षी तसेच यंदाही लॉकडाउनमुळे होलसेल व्यापार्यांनी कंपन्यांकडून खरेदी केलेला मोठा माल वितरीत करताना अडचणी येत आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील रिटेलर्सनी होलसेल व्यापार्यांना ऑडर्स दिलेल्या असल्या तरी नगर शहरातील लॉकडाउनमुळे गोडावून, दुकाने उघडण्यात अडचणी येत आहेत. पावसाळा आता अगदी तोंडावर आलेला असून सर्वसामान्य जनतेला रेनसूट तसेच इतर पावसाळी वस्तू जूनमध्ये सुरुवातीलाच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरमधील होलसेल व्यापार्यांना आपण गोदाम, दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून आम्ही ऑर्डरनुसार मालाची पॅकिंग करून तो ट्रान्स्पोर्टला टाकू शकतो. माल पॅकिंग करताना आम्ही मोजक्याच कामगारांना बोलावून काम पूर्ण करू. आमचा होलसेल व्यवसाय असल्याने किरकोळ ग्राहक आमच्याकडे येत नाही. तसेच रिटेलर्सही फोनवरच ऑर्डर नोंदवतात. त्यामुळे गर्दी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या सर्व गोष्टींची आम्ही पुरेपुर काळजी घेण्यास तयार आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आ.संग्राम जगताप यांनी व्यापार्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांत प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेवून असे आश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment