नगर जल्लोष ट्रस्टकडून कोरोना योद्ध्यांना चेंज मेकर्स व अन्नदान करणार्‍याांना अन्नदाता सन्मान जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

नगर जल्लोष ट्रस्टकडून कोरोना योद्ध्यांना चेंज मेकर्स व अन्नदान करणार्‍याांना अन्नदाता सन्मान जाहीर

 नगर जल्लोष ट्रस्टकडून कोरोना योद्ध्यांना चेंज मेकर्स व अन्नदान करणार्‍याांना अन्नदाता सन्मान जाहीर

कोरोना लॉकडाऊन काळातील कार्याचा गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 531व्या स्थापना दिनी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणार्या नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने कोरोना महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत नगरसाठी काम करणार्या कोरोना योद्धयांना चेंज मेकर्स अवॉर्ड-2021 व अन्नदान करणार्‍या संस्थांसाठी अन्नदाता सन्मान-2021 जाहीर करण्यात आले आहेत.
यात पद्मश्री पोपटराव पवार, राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, नगर विकासमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे पा, आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप, आ. नीलेश लंके, नगरसेवक मनोज दुलम, उद्योजक कैलास कोठावळे, विजय कराळे यांना चेंज मेकर्स अवॉर्ड-2021 तसेच
अन्नदान व श्रमदान करणार्या संस्थांमध्ये
श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट
श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान, गिरनार भजनसंध्या सत्संग सेवा मंडळ, लक्षेट्टी परिवार व पद्मशाली सोशल फाउंडेशन, एक हात मदतीचा, अरिहंत भोजन सेवा संस्था या अन्नदान व श्रमदान करणार्या संस्थांना अन्नदाता सन्मान-2021 पुरस्कार देण्यात येणार असल्याचे नगर जल्लोष ट्रस्ट परिवारचे अध्यक्ष सागर बोगा यांनी सांगितले. पुरस्कारांची निवड जितेंद्र तोरणे, अजय म्याना, डॉ. अमोल बागूल, दीपक गुंडू , सचिन बोगा, राहुल सप्रे यांच्या समितीने केली.
मागील 11 वर्षांपासून शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात विविध प्रकारचे उपक्रम राबवून शहराविषमी तळमळ व आस्था वाढवणार्या नगर जल्लोष परिवार ट्रस्टच्या वतीने कोरोना लॉकडाऊन कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी करणार्या कोरोना योद्धे व संस्थांचा सन्मान करण्यात येत आहे. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून पुरस्कारार्थींच्या कार्यालयात जाऊन सन्मान केला जाईल. मानपत्र, वृक्ष, सॅनिटायझर व मास्क असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष राकेश बोगा, उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत, संतोष दरांगे, अक्षय अंबेकर, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लाहोर, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल, सुनील मानकर, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, राजेंद्र निफाडकर, आदित्य फाटक, प्रशांत विधाते, इरफान शेख, अभिजीत ताठे, अजय दिवटे, रोहित चिपोळे आदी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment