सामाजिक बांधिलकी जोपासत अरणगाव व चिचोंडी पाटील कोविड सेंटरला दिला साहित्य रुपी मदतीचा हात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

सामाजिक बांधिलकी जोपासत अरणगाव व चिचोंडी पाटील कोविड सेंटरला दिला साहित्य रुपी मदतीचा हात

 बाजार समितीचे मा.सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अरणगाव व चिचोंडी पाटील कोविड सेंटरला दिला साहित्य रुपी मदतीचा हात

संकट काळामध्ये साधुसंतांनी दिलेल्या शिकवणीचा वारसा जोपासावा- हरिभाऊ कर्डिलेनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- कोरोना संकट काळामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू केल्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे. समाजामध्ये काम करत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून संकटकाळात प्रत्येकाने मदतीचा हात दिला पाहिजे,आपल्या महाराष्ट्राला साधू संतांचा वारसा मोठा आहे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपण आपले योगदान दिले पाहिजे याचं भावनेतून आपण पुढे येऊन आरणगाव व चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरला आरोग्यदायी साहित्य तसेच फळाचे वाटप करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मा.सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी व्यक्त केले.

       बाजार समितीचे मा.सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या माध्यमातून आरणगाव व चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरला आरोग्यदायी साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच मोहन गहिले, ज्ञानदेव शेळके,दीपक कार्ले,प्रशांत गहिले, उपसरपंच आदिनाथ मोडवे,बंटी पवार, अनिल राहिंज,संदीप राहिंज,सुनील कर्डिले,डॉ.ससाणे आदी उपस्थित होते.

         यावेळी बोलताना सरपंच मोहन गाहिले म्हणाले की,कोरोची दुसरे लाट महाभयंकर आहे या लाटेचा ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक फटका बसला आहे, गावोगावी अनेक रुग्ण सापडत होते त्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कोविड संकट काळात आरणगाव येथील कोविड सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावत कोरोना रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले.बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांना मदतीचा हात दिला त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here