अजुन कितीवेळा लोकांना रस्त्यावर आणायचं? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

अजुन कितीवेळा लोकांना रस्त्यावर आणायचं?

 अजुन कितीवेळा लोकांना रस्त्यावर आणायचं?

मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजेंनी फुंकलं रणशिंग


कोल्हापुर ः
केंद्र आणि राज्य सरकारांनी अशी भूमिका घ्यावी की समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये. आधीच 58 मोर्चे काढले आहेत. अजून किती वेळा लोकांना रस्त्यावर आणायचं? सध्या मराठा समाज अस्वस्थ असला तरीही करोना काळात जीव महत्त्वाचा त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल धुडकावून लागला. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र दौरा करीत असल्याची घोषणा खा. संभाजी राजे यांनी आज केली.मराठा समाजाला नेत्यांनी वेठीस धरू नये. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांनी मार्ग काढावा कोरोना संकटात जीव महत्त्वाचा असल्याने मराठा समाजाने संयम बाळगावा असेही त म्हणाले.
संभाजीराजे यांनी आज  शाहु महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.
मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या 27 तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महाराष्ट्र दौर्‍याची सुरुवात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन केली आहे.
मराठा समाजाची भूमिका समजून घेण्यासाठी आपण मराठवाडा खानदेश असा महाराष्ट्र दौरा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. आंदोलन हा एक भाग आहे. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता जीव वाचणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा विषयच चुकीचा आहे, त्यामुळे या प्रश्नावर अन्य मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणार आहे, असंही ते म्हणाले आहेत. येत्या 27 तारखेला या सगळ्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाची भूमिका समजावून देणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी फोन केल्यांचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. त्यानंतर त्यांना 27 मे किंवा 28 मे रोजी सकाळी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच इतर मोठ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment