तौत्के चक्रीवादळग्रस्तांच्या, मदतीसाठी केंद्राला पत्र लिहावं. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

तौत्के चक्रीवादळग्रस्तांच्या, मदतीसाठी केंद्राला पत्र लिहावं.

 तौत्के चक्रीवादळग्रस्तांच्या, मदतीसाठी केंद्राला पत्र लिहावं.

आ.रोहित पवारांनी विरोधीपक्षनेते फडणवीसांना सुनावलं.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नुकत्याच झालेल्या तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल अशी अपेक्षा आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
तौत्के चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच फक्त गुजरात राज्यासाठी मदत ही जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला पत्र लिहावं, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. महाविकासआघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here