या वाहनांना मिळणार दररोज 50 लिटर मोफत पेट्रोल/डिझेल, रिलायन्स पेट्रोलपंपाचा अभिनव व उपयुक्त उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

या वाहनांना मिळणार दररोज 50 लिटर मोफत पेट्रोल/डिझेल, रिलायन्स पेट्रोलपंपाचा अभिनव व उपयुक्त उपक्रम

 या वाहनांना मिळणार दररोज  50 लिटर  मोफत पेट्रोल/डिझेल, रिलायन्स पेट्रोलपंपाचा अभिनव व उपयुक्त उपक्रमनगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):- मिरजगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका यासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतुक करणाऱ्या वाहनांना दररोज ५० लिटर डिझेल अथवा पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आली असल्याची माहिती मिरजगाव रिलायन्स पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक डॉ संतोष गुरसुळे यांनी दिली. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड मार्फत मोफत इंधन देण्याचा उपक्रम देशभर राबविला जात आहे. 

              कोरोना च्या काळात प्रत्येक जण मदतीसाठी पुढे येत आहे, याकाळात एकमेकाला सहाय्य करण्याचे आवाहन केले जात असताना रिलायन्स कंपनीने अत्यंत मोठा निर्णय घेत देशातील आपल्या पेट्रोल पंपावर कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका यासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतुक करणाऱ्या वाहनांना दररोज मोफत डिझेल पेट्रोलदेण्याचा निर्णय घेतलेला असून त्या अंतर्गत 

रीलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड मार्फत कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रिलायन्स पंपावर दररोज ५० लिटर डिझेल अथवा पेट्रोल मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे शनिवार दि 15 मे पासून अनेक रुग्णवाहिका आणि आपत्कालीन काळात सेवा देणारे वाहन याचा लाभ घेत असल्याची माहिती व्यवस्थापक डॉ संतोष गुरसुळे, विभागीय व्यवस्थापक अभिजीत गिजगे यांनी दिली आहे. यासह कर्जत तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही रिलायन्स पंप मिरजगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here