महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसलीतरी आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा कायम देणार.- नगरसेवक अशोक बडे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसलीतरी आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा कायम देणार.- नगरसेवक अशोक बडे.

 महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसलीतरी आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा कायम देणार.- नगरसेवक अशोक बडे.   

आम्ही केलेल्या कामाचा श्रेय दुसऱ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी घेतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.नगरी दवंडी

नगर- सर्वात प्रथम नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.स्वताची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. नगर मध्ये महानगरपालिका आहे मात्र त्यामध्ये शहराचा विकासा बाबत चोक नियोजन केले जात नाही.अनेक वर्षान पासून प्रलंबित असलेले शहरातील प्रश्न सूटत नाहीत.निवेदन द्या आंदोलन करा तरीही काम होईल असे खात्रीशीर वाटत नाही. या भागात जो पर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तो पर्यंत आम्ही नागरिकांचे प्रश्न कायम सोडवत राहणार. महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसलीतरी आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा कायम देणार.असे प्रतिपादन नगरसेवक अशोक बडे यांनी केले.

   प्रभाग क्रमांक सात येथील माताजीनगर परिसरात पिण्याच्या पाणीची पाईपलाईनचे उद्घाटन प्रभागातील जेष्ठ नागरीक यादव भोर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक अशोक बडे, दत्ता सप्रे, भैय्या साठे, संजय गायकवाड,किशोर माळवी, नितीन म्हस्के व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

   अशोक बडे पुढे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून या माताजीनगर मध्ये पिण्याची पाईपलाईन नव्हती त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पिण्याचा पाणीसाठी हाल होत होते. मी दोन हजार नऊ पासुन याबाबत महापालिकेत पाठपुरावा केला निवेदन दिली आंदोलन केले मोर्च काढले त्यानंतर या भागात टॅकर सुरु झाले.त्यानंतर आम्ही या भागात पिण्याचा पाणीची पाईपलाईन टाकण्यात यावी जेणे करून नागरिकांना त्यांचा घरात पिण्याचे पाणी मिळेल त्या आज यश आले आहे. आता नागरिकांना त्याचा घरात पिण्याचे पाणी मिळणार आहे.  आम्ही केलेल्या कामाचा श्रेयः दुसऱ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी घेतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

No comments:

Post a Comment