एमपीएससी परीक्षा 11 एप्रिललाच होणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

एमपीएससी परीक्षा 11 एप्रिललाच होणार

 एमपीएससी परीक्षा 11 एप्रिललाच होणार

मुंबई ः गेल्या वर्षभरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. याचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थींनकडून परीक्षा घेण्याबाबत सतत आंदोलन केली जात होती. या आंदोलनामुळे गेल्या महिन्यात 21 मार्चला एमपीएससीची पूर्वपरीक्षा घेण्यात आली. तसेच येत्या रविवारी 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील वेळापत्रकानुसारच होणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परीक्षा केंद्रावर खबरदारी आणि कोरोना नियमांचे पालन होऊन परीक्षा घेतल्या जाणार आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
    राज्यात झपाट्याने वाढणार्‍या कोरोनामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले. तसेच शनिवार आणि रविवार या विकेंड दिवशी कडक लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत लॉकडाऊनदरम्यान एमपीएससी परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी असे सरकारला आवाहन केले आहे.
    या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की, ‘लॉक डाऊन’ असताना रविवारी (ता.11) होणार्‍या चझडउ परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती. अशी मागणी त्यांनी या ट्विटमध्ये केली आहे.

No comments:

Post a Comment