आ. रोहित पवारांच्या पाठपुराव्याने जामखेडला उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

आ. रोहित पवारांच्या पाठपुराव्याने जामखेडला उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी

 आ. रोहित पवारांच्या पाठपुराव्याने जामखेडला उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी

रुग्णालयासाठी 100 खाटांचे श्रेणीवर्धन; लवकरच प्रशस्त इमारत व मनुष्यबळही
नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध!
    ’येथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे.रस्ते, पाणी या प्रशांबरोबरच आरोग्याचा प्रश्नही माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे.हे रुग्णालय झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.लवकरच आता प्रशस्त इमारत आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड तालुक्यापासून जिल्हा रुग्णालयाचे अंतर जास्त असल्याने येथील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास मर्यादा येत आहेत.तीन जिल्ह्याची सीमारेषा, आणि व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या जामखेड शहराच्या लोकसंख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या या ठिकाणी असलेल्या तालुका रुग्णालयात आणि इतर खाजगी दवाखान्यांमध्येही आय.सी.यु. सुविधा उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अपघात तसेच अनेक आजारांवर तात्काळ उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे येथील नागरिकांना शक्य नसल्याने जामखेड याच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाऐवजी उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.रोहित पवार यांनी या विषयी लक्ष घालून जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवली आहे.
   येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांवरून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास ’विशेष बाब’ म्हणुन मान्यता देण्यात आली आहे.जामखेड येथे सध्या तीस खाटांची क्षमता असलेले तालुका ग्रामीण रुग्णालय आहे मात्र वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सुविधा देण्यास मर्यादा पडत आहेत. आ. रोहित पवार यांनी प्रयत्न आणि पाठपुरावा करून आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून ही मान्यता मिळवली आहे.
संबंधित रुग्णालयासाठी जागा अधिग्रहीत करने,बांधकाम करणे व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.जामखेड तालुक्यासाठी मंजुर झालेल्या या उपजिल्हा रुग्णालयामुळे नागरिकांना आता वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेणे गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही.जामखेडकरांसाठी आ.पवार यांनी घेतलेला हा निर्णय खुपच महत्वपूर्ण असुन आरोग्याबाबत त्यांचे व्हिजन पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
जामखेड व तालुक्याच्या सर्व गावांतील जनतेकडून आ. रोहित पवार यांचे आभार मानण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment