निघोज येथील राहुल रसाळ यांना उद्यान पंडीत पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

निघोज येथील राहुल रसाळ यांना उद्यान पंडीत पुरस्कार

 निघोज येथील राहुल रसाळ यांना उद्यान पंडीत पुरस्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः तालुक्यातील निघोज येथील राहुल रसाळ यांना राज्य शासनाकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा उद्यान पंडीत पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासणाच्या वतीने 31 मार्चच्या शासण निर्णयाने या पुरस्कारांची घोषणा झाली. राज्यातील प्रगतशील शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या सन्मानार्थ हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
   राहुल रसाळ यांनी द्राक्ष व डाळींब शेतीत विविध नवीन्यपुर्ण प्रयोग राबवले आहेत. त्यांच्याकडे 45 एकर शेती आहे. त्या पैकी 20 एकर द्राक्ष तर 10 एकर डाळींब आहे. उरलेल्या 15 एकरवर ते भाजीपाला पिकवतात. राहुल हे कृषी पदवीधर असुन त्यांनी आज पर्यत स्वखर्चाने 8 देशांचा शेती अभ्यास दौरा पुर्ण केलेला आहे. त्यांनी ब्राझील येथील नावाजलेल्या  क्रीमसन द्राक्ष  वानाची  लागवड  प्रथमच केली आहे.
   निघोज परिसरात कुकडी प्रकल्पाचे पाणी आल्यानंतर  सन 1990 ला त्यांचे वडील अमृता रसाळ यांनी प्रथमच डाळींब व द्राक्ष बाग लागवड केली होती. आधुनिक शेतीचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाल्याचे ते सांगतात. राहुल यांचा सेंद्रिय  शेतीकडे केले आहे. त्यासाठी आज त्यांच्याकडे 10 गीर गायी आहेत. शेण व गोमुत्रापासुन ते स्लरी तयार करतात. त्यासाठी मोठा टॅक तयार केला आहे.बागांना स्लरी सोडण्याचे ट्रॅक्टर संचलीत यंत्र  त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केले आहे. त्यांची सर्व शेती ठिबक सिंचनावर आहे. आच्छादन व  क्रॉप कव्हर याचाही ते वापर करतात. कारले, कर्टुली, ढोबळी, टॉमॅटो ई भाजीपाला पिके ते घेतात. त्यांची द्राक्षे गेल्या 20 वर्षापासुन युरोपात निर्यात होतात. डाळींबाच्या भगवा, गणेश जातीची त्यांनी  परिसरात प्रथमच लागवड केली होती. त्याची शेती पाहुन परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने करू लागले. शेतीचे काटेकोर नियोजन व हिशोब ते ठेवतात. द्राक्षाच्या तास ए गणेश, सुपर सोनाका, शरद सीडलेस , क्रिमसन, माणिकचमन अशा वानांची लागवड त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment