आ. नीलेश लंके यांच्या खांदयाला खांदा लाऊन अमोल धामणे करीत आहेत रूग्णसेवा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 28, 2021

आ. नीलेश लंके यांच्या खांदयाला खांदा लाऊन अमोल धामणे करीत आहेत रूग्णसेवा !

 आ. लंके यांच्यासमवेत सावलीसारखे असणारे धामणे हे अंगरक्षक म्हणून नव्हे तर समाजसेवक .....

आ. नीलेश लंके यांच्या खांदयाला खांदा लाऊन अमोल धामणे करीत आहेत रूग्णसेवा !



पारनेर : प्रतिनिधी

कोरोना महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आमदार नीलेश लंके गेल्या वर्षभरापासून चोविस तास लढा देत असून त्यांच्या या  अव्दितीय कामगिरीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. आ.लंके यांच्या सहकाऱ्यांचेही त्यात मोठे योेगदान असून त्यांचे अंगरक्षक अमोल धामणे हे देखील त्यात मागे नाहीत. आ. लंके यांच्यासमवेत सावलीसारखे असणारे धामणे हे अंगरक्षक म्हणून नव्हे तर समाजसेवक म्हणून आहोरात्र झटत आहेत !

नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणूकीत विजय संपादन केल्यानंतर शासनाच्या वतीने अमोल धामणे या पोलिस कर्मचाऱ्याची त्यांचा अंगरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्या दिड वर्षात धामणे यांनी अंगरक्षक म्हणून नव्हे तर आ. लंके यांचा जिवाभावाचा सहकारी म्हणूनच ते काम पाहत आहेत.  खरे तर आ. लंके हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराडयात असतात. त्यांचे जिवलग कार्यकर्ते हेच त्यांचे सुरक्षा कवच. त्यामुळे अंगरक्षक म्हणून वेगळे काही करण्याची धामणे यांच्यावर एकदाही वेळ आली नाही. आ.लंके यांचा सकाळपासून सुरू झालेला प्रवास रात्री उशिरा संपतो. त्यादरम्यान धामणे हे आ लंके यांच्या समवेत असतात. दिवसभरात आ. लंके यांच्या फोनवर आलेले फोन स्विकारणे, समोरच्या व्यक्तीच्या अडचणी समजाऊन घेणे, त्याची नोंद करून आ.लंके यांना वेळ मिळाल्यावर त्याबाबत त्यांना माहीती देणे, आ. लंके यांच्या स्वीय सहायकाच्या संपर्कात राहणे, एखाद्या व्यक्तीची अडचण सोडविता येणे शक्य असेल तर परस्पर फोन करून ती दुर करणे अशा कामांमध्ये धामणे हे दिवसभर व्यस्त असतात.

सकाळी सुरू झालेला आ. लंके यांचा दौरा कधी संपणार याची खात्री नसते. दिवसभरातील जेवणाचीही निश्‍चित वेळ नाही. त्यामुळे ज्यावेळी आमदार जेवणासाठी बसणार त्याच वेळी धामणे हे स्वतःचा डबा घेउन त्यांच्याच समवेत जेवणासाठी बसतात. आ. लंके यांच्या भरगच्च दिनक्रमात धामणे यांची चांगलीच दमछाक होते, मात्र त्यांची त्याबाबतही कधी कुरबुर नसते. आ. लंके यांच्या वाहनात नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी ! त्यामुळे दररोजच दाटीवाटीने प्रवास हा नित्याचाच. त्याबाबतही धामणे यांची तक्रार नाही.

 कोरोना महामारीच्या कालावधीमध्येही आ. लंके यांच्याप्रमाणेच धामणे यांचाही दिनक्रम व्यस्तच. फोनवर कोणी इंजेक्शन, कोणी हॉस्पिटलमध्ये बेड तर कोणी अंत्यविधीसाठी मदतीची मागणी करत असते. त्याची नोंद घेउन सबंधित व्यक्तीची व्यवस्था हाईपर्यंत धामणे हे त्याचा पाठपुरावा करतात. आ.  लंके यांच्या कामाला राज्यभर प्रसिद्धी मिळाली. आ. लंके यांच्यासोबत सावली सारखे असलेले अमोल धामणे मात्र प्रसिद्धीपासून दूर आहेत.

No comments:

Post a Comment