प्राथ. शिक्षक मित्रमंडळाची मदत प्राणवायू सारखी अनमोल - उपसभापती डॉ. दिलीप पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 27, 2021

प्राथ. शिक्षक मित्रमंडळाची मदत प्राणवायू सारखी अनमोल - उपसभापती डॉ. दिलीप पवार.

 प्राथ. शिक्षक मित्रमंडळाची मदत प्राणवायू सारखी अनमोल - उपसभापती डॉ. दिलीप पवार.
नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर - नगर तालुक्यातील पाच शासकीय कोविड केंद्रांना एक लाख रुपये किंमतीची कोरोना उपचार उपयोगी औषधे व प्रतिबंधात्मक साहित्य प्राथमिक शिक्षकाने दिले. प्राथमिक शिक्षकांची मदत ही प्राणवायूसारखी अनमोल आहे. या उपक्रमांतून शिक्षकांनी एक नवा आदर्शच निर्माण केलेला आहे असे प्रतिपादन पंचायत समिती  उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केले .

 नगर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा संदीप गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व कोविड केंद्रांच्या संदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक आम्ही -अहमदनगर या ग्रुपच्या वतीने कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्यासाठी कार्यरत असलेले कोरोना योद्धे यांना प्रत्यक्ष मदत देण्याच्या उद्देशाने जि.प.च्या प्राथ. शिक्षक मित्र मंडळाने सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन करून मदतनिधी उभारण्यात आला. त्यामधून  कोविड केंद्रांना एक लाख रुपये किंमतीचे साहित्य - सॅनिटायझर, अँटोमॅटीक हॅन्ड सॅनिटराइझ मशीन, व्हेपोराईझ मशीन आणि कोरोना उपचारासाठी उपयुक्त औषधे उपसभापती डॉ. दिलीप पवार, पं. स. सदस्य श्री. गुलाबराव शिंदे, गटविकासाधिकारी सचिन घाडगे, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांचेकडे सूपूर्द करण्यात आले.याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी शिक्षकांनी केलेल्या मदतीबद्दल प्राथ. शिक्षकांना धन्यवाद दिले. यावेळी शा.पो.आ.अधीक्षक  प्रदीप शिंदे, प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ससाणे, डॉ. कोठुळे व ग्रुपचे शिक्षक सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here