कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम पडते अपुरे... या ठिकाणी कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम पडते अपुरे... या ठिकाणी कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था.

कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम पडते अपुरे... या ठिकाणी कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था.



नगरी दवंडी

अहमदनगर - कोरोनाने जिल्ह्यात कहर माजवला असताना, दररोज मोठ्या संख्येने कोरोनारुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. तर मृतदेह अमरधाममध्ये आनण्यास काही रुग्णवाहिका चालक सात ते आठ हजार रुपयांची मागणी करत आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेने नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन पुढाकार घेऊन नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी उचलली आहे. तर कोरोना रुग्णाचे मृतदेह आनण्यासाठी अत्यल्पदरात शववाहिका देखील उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी दिली.

 कोरोनाने शहरासह जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली असताना, दररोज कोरोना रुग्णांचे मृतदेहांचे खच पडत आहे. याचा ताण शहरातील एकमेव अमरधामवर पडत असताना दररोज 45 पेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्काराला येत आहे. विद्युतदाहिनीची क्षमता 20 मृतदेहाची असताना उर्वरीत मृतदेहांची ओट्यावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये केडगाव अमरधामच्या धर्तीवर नागापूर येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सुचनेनूसार कोरोनाने मृतपावलेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील अमरधाममध्ये दिवसातून 45 पेक्षा कोरोनाने मृतपावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असतानाचे विदारक व मन हेलावणारे चित्र पहावयास मिळाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करुन देखील उर्वरीत मृतदेह प्रतिक्षेत आहे. शहरातील अमरधामचा भार हलका करण्यासाठी व मृतदेहावर वेळेत अंत्यविधी होण्यासाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. मृतदेह घेऊन जाण्यासाठी शववाहिका देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून, कोरोनाच्या मृतदेहावर अत्यल्प एक हजार रुपयात अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment