महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलिस दलाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 29, 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलिस दलाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

 महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलिस दलाच्या वतीने रक्तदान शिबीरात रक्तदान करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी

जामखेड -जागतीक महामारीच्या काळात वाढत असलेली रक्ताची गरज लक्षात घेऊन व रक्तटंचाईमुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या कोणाचेही प्राण जाऊ नयेत याची गरज ओळखून जामखेड पोलिस स्टेशनचे संवेदनशील मनाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. 

  सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं राज्यात थैमान घातले आहे. कोरोना बाधीतांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यातच नगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलिस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दिनांक ०१ मे रोजी जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर १मे रोजी महावीर मंगल कार्यालय जामखेड येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान पार पडणार आहे. तरी या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले देशासाठी असलेले योगदान द्यावे व गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here