एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की.

 एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की.


आंबाजोगाई ः
राज्यात कोरोना परिस्थिती अक्षरशः भयावह होत चालली आहे. ज्याप्रमाणे इतर देशांमध्ये उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, तशी काहीशी परिस्थिती राज्यातल्या एका भाग दिसून आली आहे. ब्राझीलमध्ये सध्या कोरोना मृत्यूची संख्या वाढत असल्यामुळे दफन करण्यासाठी जागा नाही आहे. असेच काहीसे दृश्य बीडमध्ये दिसत आहे. हा फोटो ब्राझीलमधला नसून बीडमधला आहे. बीडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन लावूनही कोरोना कहर मात्र नियंत्रणात आलेला नाही आहे. एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ आली आहे.

   कोरोना विषाणूमुळे माणूस माणसापासून दुरावला आहे. प्रत्येकाला आपल्या माणसाला मृत्यू आधी शेवटचं पाहण्याची खूप इच्छा असते. पण कोरोनामुळे हिच इच्छा आता पूर्ण होत नाही आहे. बीडमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच सरणावर 8 कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाईतील मांडवा रोडवरील स्मशानभूमीत हे दृश्य आहे. या दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकाच सरणावरती 8 कोरोना रुग्णांवर अग्नी डाग दिला. यापूर्वी 6 सप्टेंबर 2020ला बीडमध्ये अंबाजोगाईमधल्या स्मशानभूमीत 8 मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 7 महिन्यांनंतर तीच दुर्दैवी परिस्थिती बीडमध्ये उद्भवली आहे. बीडमध्ये काल दिवसभरात 716 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना मृतांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता रात्री पुन्हा एकदा बीड जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत.

No comments:

Post a Comment