विवाह जुळवण्याच्या नावाखाली व्हाटस्अ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक सावधान राहा ः जयकिसन वाघ यांचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

विवाह जुळवण्याच्या नावाखाली व्हाटस्अ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक सावधान राहा ः जयकिसन वाघ यांचे आवाहन

 विवाह जुळवण्याच्या नावाखाली व्हाटस्अ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून होऊ शकते  फसवणूक सावधान राहा ः जयकिसन वाघ यांचे आवाहन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मानवी जीवनातील विविध संस्कारांपैकी विवाह हा अतिशय पवित्र संस्कार आहे. या संस्काराच्या निमित्ताने दोन कुटुंब पिढ्यानपिढ्या साठी कायमची एक होत असतात. मात्र अलीकडे विवाह जुळवण्यात निर्माण होणार्‍या अडचणी पाहता या गोष्टी हेरुन ऑनलाइन फसवणुकीच्या फंड्या याप्रमाणे व्हाटसअ‍ॅप ग्रृप च्या व  विवाह संस्थेच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत.
विवाहोत्सुकांनी यापासून वेळीच सावध राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जयकिसन वाघपाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
    ऑनलाइन व व्हाटसअ‍ॅप ग्रृप च्या माध्यमातून फसवणुकी बाबत  नागरिकांच्यात जागृती झाली असताना हे प्रकार काहीसे कमी होत असतानाही अलीकडे विवाह जुळत नाहीत. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामागे पूर्वी मुला-मुलीत विवाह जोडायचे आता अपेक्षा, प्रोफेशन व शिक्षण जुळत नसल्याने विवाह जुळण्यात विलंब होत आहे. त्यातच गरीब कुटुंबात विवाह करण्यात अडचणी निर्माण होत आहे. नेमक्या याच बाबी हेरुन अनेकांनी व्हाटसअ‍ॅप च्या माध्यमातून लिंक शेअर करुन वधु-वर ग्रृप तयार करुन फसवणूक करणार्‍यांचे मोठे रॅकेट कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.व विवाह संस्थेची नोंदणी करून हे रॅकेट सेवा शुल्क व समाजाच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या सोशल व्हाटसअ‍ॅप  ग्रुप वरून प्रसारित होणार्‍या बायोडाटा वरील नंबर घेऊन त्या  फोन नंबर वर व्हाटसअ‍ॅप च्या माध्यमातून फेक फोटो व बॉयोडाटा पाठवुन फसवणूक करीत असल्याबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत. सध्या अनेक वधु-वर व पालक  सोशलमिडीयाच्या व्हाटसअ‍ॅप ग्रृप  वर बॉयोडाटा शेअर करण्यात धन्यता मानतात,ते त्या ग्रृप ची व अ‍ॅडमिन ची चौकशी न करता बिनधास्त पणे आपल्या मुला-मुलींचे फोटो व बॉयोडाटा अनओळखी व्हाटसअ‍ॅप ग्रृप वर शेअर करतात. त्त्या  ग्रृप बद्दल काहीच माहिती नसल्याने त्या वर अनेक दलाल आणि एजंन्ट असण्याची शक्यता असते. ते हे शेअर झालेले फोटो व बॉयोडाटा घेऊन आपल्या संकेतस्थळावर त्यांची माहिती टाकतात. ते फोटो व बॉयोडाटे इतर आपल्या ग्रृप वर शेअर करतात ते शेअर झालेले फोटो व बॉयोडाटा त्या वधु-वर व पालकांना माहिती हि नसते. नंतर हे लोक व्हाटसअ‍ॅप ग्रृप तयार करुन त्या लोकांना जमा केलेले फोटो व बॉयोडाटा दाखवुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धंदा सध्या जोरात सुरु आहे.अशा प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर याबाबत पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे हे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे विवाह जुळवून देतो, परंतु त्याआधी अमुक रक्कम भरा. असा फोन आल्यास कोणीही पैसे भरू नये. अनओळखीच्या व्हाटसअ‍ॅप ग्रृप वर फोटो व बॉयोडाटा शेअर करु नये.एकदा शेअर झालेला फोटो व बॉयोडाटा अनेक वर्षानुवर्षे सोशलमिडीयावर शेअर होत असल्याने अनेक वधु पिता सध्या त्रास्त झालेले आहेत.त्यामुळे कोणीही अनओळखीच्या व्हाटसअ‍ॅप ग्रृप ला अ‍ॅड होऊ नये अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. असे कळकळीचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा सकल मराठा सोयरीक ग्रुपचे मुख्य समन्वयक जयकिसन वाघपाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment