आ.निलेश लंकेच्या 1 हजार बेडच्या कोव्हिड सेंटरला सर्वोतोपरी प्रशासकीय मदत ः जिल्हाधिकारी भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

आ.निलेश लंकेच्या 1 हजार बेडच्या कोव्हिड सेंटरला सर्वोतोपरी प्रशासकीय मदत ः जिल्हाधिकारी भोसले

 आ.निलेश लंकेच्या 1 हजार बेडच्या कोव्हिड सेंटरला सर्वोतोपरी प्रशासकीय मदत ः जिल्हाधिकारी भोसले

आ. निलेश लंकेच्या माध्यमातून दुसर्‍यांदा भाळवणीत 1 हजार 100 बेडचे कोव्हिड सेंटर.

भाळवणीच्या भुजबळ कुटुंबीयांचे योगदान.. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कुस्तीसाठी नावाजलेले भुजबळ कुटुंबीयांनी या सेंटरसाठी आपले मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले असून त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले आहे. तर दुसरीकडे कोरोना सारख्या महामारीच्या काळात एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न भाळवणी येथील भुजबळ यांनी केला आहे त्यामुळे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी या कोव्हिड सेंटरला दिले आहे. भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात आठ एकर जागा या भुजबळ कुटुंबियांनी दान केली आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी दुसरांदा 1 हजार 100 बेड कोव्हिड सेंटर सुरू करून प्रशासनासह जनतेला फार मोठा दिलासा दिला आहे . त्यामुळे या भाळवणी येथील कोव्हीड सेंटरला सर्वतोपरी प्रशासकीय मदत करण्याची जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी यांनी दिले आहे.आमदार निलेशजी लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शरदचंद्रजी पवार  आरोग्य मंदिराला बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राजेंद्रजी भोसले  यांनी भेट देऊन संपूर्ण आरोग्य मंदिराची पाहणी केली. व आमदार निलेशजी लंके यांनी चालवलेल्या या सेवाभावी आरोग्य मंदिराची सर्व आयोजक व नियोजन मंडळाचे कौतुक करून या आमदार निलेशजी लंके यांना शब्द दिला आहे.

मी असुरक्षित असलो तरी चालेल परंतु माझी माय - बाप जनता असुरक्षित असता कामा नये ही भावना कोरोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जपली आहे.त्यामुळे बेड मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही उपचार नाही यासारखे दिवसभरात हजारो फोन आमदार निलेश लंके यांना येत असल्याने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह सर्व दैनिकांच्या संपादकांच्या उपस्थित पुन्हा एकदा 1 हजार 100 बेडच्या कोव्हिड सेंटरचा शुभारंभ झाला आहे . यामध्ये 100 ऑक्सिजन बेडचा सामावेश असुन लसीकरणाची सोय याठिकाणी करण्यात आली असून मोफत उपचार या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
कोरोनाच्या दुसर्‍याला लाटेमध्ये रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याला पारनेर - नगर मतदार संघ सुद्धा अपवाद राहिलेला नाही. येथेही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची हाल होऊ नये त्यांना योग्य व मोफत उपचार मिळावेत यासाठी आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.सर्वसामान्य रुग्णांची होणारी परवड पाहून आमदार निलेश लंके यांनी गेल्या वर्षी कर्जुले हर्या या ठिकाणी 1 हजार बेडचे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदीर या नावाने कोव्हिड सेंटर सुरू केले. येथे साडेचार हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी मोफत उपचार घेतले. सामान्य रुग्णांचे कोट्यावधी रुपये वाचले. रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले. यामध्ये,प्रत्येक रुग्णांकरीता स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टीमर, नॅपकिन, पाणी बाटली, साबण इत्यादी मूलभूत सुविधा रुग्णांना दिल्या जाणार.24 तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी व वापरण्या साठी गरम पाणी. या केअर सेंटर मध्ये बनविलेले सकस जेवण, ज्यामध्ये दूध, अंडी, सूप, पोषक आहार व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे यावेळी दिले जाणार आहेत.
सलग दुसरा वर्षी गेल्या काही दिवसापासून कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. पारनेर -नगर मध्येही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडू लागले आहेत. कुटुंब ची  कुटुंब या आजाराने बाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अनेकांच्या खिशाला परवडणारे नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी या रुग्णांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here