व्यावसायिकांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

व्यावसायिकांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम

 व्यावसायिकांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः काल पाच तारखेला सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आदेश पारित करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.आणि लागलीच व्यापार्यांमध्ये एकच गोंधळाचं वातावरण तयार झाले ,त्यातून अफवांचा बाजारही फुलला. कोण म्हणायचं हे चालू ठेवा कोण म्हणायचं ते बंद ठेवा अशा पध्दतीने छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झाले.जिल्हाधिकार्यांनी आदेश देऊनसुद्धा छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी मात्र नेवासा तालुक्यात आपले व्यवसाय चालू केले नाहीत दंडाची भीती आणि होणार्‍या कारवाईला सामोरे जाण्याची आमची तयारी नसल्याचे यावेळी  छोट्या व्यावसायिकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment