नारायणडोहो येथे बॉम्बस्फ़ोट : दोन जखमी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 30, 2021

नारायणडोहो येथे बॉम्बस्फ़ोट : दोन जखमी

 नारायणडोहो येथे बॉम्बस्फ़ोट : दोन जखमीनगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर : नगर तालुक्यातील नारायणडोह परिसरातील एका शेत वस्तीवर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. २८) सायंकाळी ही घटना घडली.

दरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर चार किलोमीटर परिसरात त्याचे हादरे जाणवले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नारायणडोह गावापासून काही अंतरावर असणाऱ्या बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता.  या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता. 

दरम्यान, शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बाॅम्ब गोळा सापडला. त्या महिलेने तो बाॅम्ब गोळा जवळ शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला. त्याने तो बाॅम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात, अक्षय  व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले आहेत. या बॉम्ब स्फ़ोटाचा आवाज 3 ते 4 कि.मी पर्यंत गेला. 

या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी पथकासह भेट दिली. यानंतर घटनास्थळाची बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली. या परिसरात अजून काही बॉम्ब आहेत का याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली. परंतु इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here