‘राष्ट्रीय संविधान संघ अहमदनगर’च्या वतीने महामानव आंबेडकर यांना ऑन लाईन अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

‘राष्ट्रीय संविधान संघ अहमदनगर’च्या वतीने महामानव आंबेडकर यांना ऑन लाईन अभिवादन

 ‘राष्ट्रीय संविधान संघ अहमदनगर’च्या वतीने महामानव आंबेडकर यांना ऑन लाईन अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना130व्या जयंतीनिमित्त अहमदनगरला राष्ट्रीय संविधान संघाच्या वतीने ऑन लाइन यु ट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष प्रा गणेश डहाणे व ओंकार डहाणे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले बुद्धवंदना होऊन कार्यक्रम सुरू झाला. प्रा डहाणे यांनी बाबासाहेबांच्या त्रिसूत्री ची सविस्तरपणे माहिती दिली शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे समजुन घेऊन प्रत्यक्ष जीवनात अवलंबन करावे असे आवाहन त्यांनी केले. या ऑन लाईन कार्यक्रमामध्ये133मान्यवरांनी सहभाग नोंदवला भीमसैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली सुत्रसंचलन महेश रोकडे तर आभार वैभव रोकडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here