स्थलांतरित कामगारांसाठी कामगार आयुक्तालयाच्यावतीने समुपदेशन केंद्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 10, 2021

स्थलांतरित कामगारांसाठी कामगार आयुक्तालयाच्यावतीने समुपदेशन केंद्र

 स्थलांतरित कामगारांसाठी कामगार आयुक्तालयाच्यावतीने समुपदेशन केंद्र

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्थलांतरीत कामगारांची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोंदणी सुरु करण्यात आली असुन कामगारांनी पुर्ण माहिती त्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  जिल्हयातील विविध आस्थापना, कारखान्यांमध्ये काम करित असलेले स्थलांतरीत किंवा परप्रांतीय कामगार निर्बंधामुळे त्यांच्या मुळगावी (मुळ राज्यात) जात असल्यास या कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता,मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव, पत्ता आदी माहिती तसेच परराज्यात काम करीत असलेले अहमदनगर जिल्हयातील कामगार जर लॉकडाऊनमुळे जिल्हयात त्यांचे मुळगावी परत येत असतील किंवा असतील तर त्यांनीही याच प्रकारची माहिती  रलश्र.परसरी1सारळश्र.लेा  या मेलवर पाठविणे गरजेचे आहे. जिल्हयातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारांकरिता सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, आशिष बंगला, सथ्था कॉलनी, स्टेशनरोड, अहमदनगर येथे हे समुपदेशन केंद्र करण्यात आले आहे. सरकारी कामगार अधिकारी  यासीन शेख. या  केंद्राचे  प्रमुख म्हणून  काम  पाहात आहेत.  स्थलांतरीत कामगारांनी त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांकरिता मोफत टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा. तसेच स्थलांतरीत कामगारांना अडचणी किंवा प्रश्न असल्यास या कार्यालयाकडील केंद्र प्रमुख यांच्याशी कार्यालयाच्या दुरध्वनी  0241-2451852/ 9960452233  या क्रमांकावर व पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त  राऊत  यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here