साकतखुर्द येथे सोडीयम हायपोक्लोराइडची फवारणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 10, 2021

साकतखुर्द येथे सोडीयम हायपोक्लोराइडची फवारणी

 साकतखुर्द येथे सोडीयम हायपोक्लोराइडची फवारणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना साथरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे सोडीयम हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली.
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून साकतखुर्द येथे अत्तापर्यंत सुमारे वीस ते बावीस कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गावात प्रथमच एव्हढया मोठया संख्येने रुग्ण आढळल्या मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खबरदारी चा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील ज्या ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या भागात, तसेच ज्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली त्याठिकाणी , मंदिरे, सभामंडप, ठिकाणे, चौक, बसण्याचे बाकडे आदी ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली. सशल डिस्टन्सचे नियम पाळून ही फवारणी करण्यात आली. यासाठी उपसरपंच बाबासाहेब चितळकर, ग्रा.पं. सदस्य बापू निमसे, अविनाश पवार, पांडुरंग शिंदे, दादा पवार, सरपंच बापू केदारे, नवनाथ केदारे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here