ना. थोरातांच्या बंगल्यावर वाळू ठेकेदारांचा आत्महत्येचा प्रयत्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

ना. थोरातांच्या बंगल्यावर वाळू ठेकेदारांचा आत्महत्येचा प्रयत्न.

 वाळू ठेक्यासाठी भरलेले 8 लाख 75 हजार परत मिळविण्यासाठी...

ना. थोरातांच्या बंगल्यावर वाळू ठेकेदारांचा आत्महत्येचा प्रयत्न.

मुंबई :
शासनाकडे वाळू उत्खननासाठी भरलेले 8 लाख 72 हजार रुपये लवकर परत मिळावे म्हणून नेवासा येथील वाळू ठेकेदार पांडुरंग वाघ यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी वाघ यांना योग्य वेळी अडवले आणि आत्महत्या करण्यापासून रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी 41 (1) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असे पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.

   नेवासा येथील झापडी गावाचे पांडुरंग वाघ हे रहिवाशी आहेत. 2018 मध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीचा वाघ यांनी शासनाकडून परवाना मिळवला होता. त्यांनी त्यासाठी शासनास 8 लाख 72 हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केले होते.
   पण वाळू उपसा स्थानिकांच्या विरोधामुळे झाला नाही. गावकर्‍यांच्या वारंवार विरोधामुळे वाघ यांचे नुकसान होत होते. वाळू उपसण्याचे काम शासनाकडून मिळाल्यानंतर सुद्धा वाघ त्यांना ते काम करता येत नसल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.
   स्थानिकांना समजावण्याचा वाघ यांनी प्रयत्न केला, काम सुरू करण्यासाठी अटी शर्तीचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना काही यश न आल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा शासनाचे दार ठोठावले आणि शासनाकडे भरलेले आपले पैसे परत मिळावे म्हणून यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण शासनाकडून याबाबत काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

No comments:

Post a Comment