मोफत शिबिरे ही गोरगरीबांकरिता वरदान - दिलीप सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

मोफत शिबिरे ही गोरगरीबांकरिता वरदान - दिलीप सातपुते

 स्व.राठोड जयंतीनिमित्त सर्वरोगनिदान संपन्न.

मोफत शिबिरे ही गोरगरीबांकरिता वरदान- दिलीप सातपुते

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः समाजातील दु:ख निवारण्याचे काम शिवसेना नेहमीच करत असते. या कार्याची व्याप्ती आणखी वाढून त्याचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ व्हावा. कोरोनामुळे गरीबाला रोजचा खर्च भागवताना कंबरडे मोडले आहे  आपल्या होणार्‍या त्रासाकडे तो दुर्लक्ष करतो प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. त्यामुळे गरीबांना उपचार घेणे अवघड जात आहे.  मोफत शिबिरे ही गोरगरीबाकरीता वरदान ठरत आहे असे प्रतिपादन  दिलीप सातपुते यांनी केले.
   माजी महापौर अभिषेक कळमकर मित्र परिवार व शिवसेना नगर शहराच्या वतीने हिंदूधर्मरक्षक स्व.आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त एकविरा चौकातील प्राईम केअर हॉस्पिटल मध्ये सर्व रोग निदान,  उपचार  व मार्गदशन शिबिराचे उद्घाटन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.अभिषेक कळमकर म्हणाले की,स्व.आमदार अनिल भैय्या राठोड यांना अभिप्रेत असे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. गोरगरीबाची सेवा या माध्यमातून करत आहे.सामान्य माणसाला रोजचा खच भागवताना तो आपल्या आरोग्याकडे दुलक्ष करतो परंतू या शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांना या रूग्णसेवेचा फायदाच मिळेल.
   यावेळी डॉ पियुष पाटील यांनी आभार मानले. सुत्रसंचालन शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे यांनी केले.
यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, विक्रम राठोड,डॉ पियुष पाटील,संभाजी कदम,अनिल शिंदे,गिरीश जाधव,दत्ता जाधव,योगिराज गाडे, बाळासाहेब बोराटे,संतोष गेनप्पा, संजय शेंडगे,श्रीनिवास बोज्जा,रवी वाकले अशोक दहीफळे,अंबादास शिंदे,काका शेळके,दशरथ शिंदे,संजय आव्हाड,नितीन वाकळे,दीपक अडेप,बल्लू सचदेव,पराग गुंड,आकाश कातोरे, प्रशांत पाटील,महेश गलांडे ,अनिकेत कराळे,ऋतुराज आमले,भिमराज कराळे आदी  मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here