विठ्ठल अण्णा राऊत यांचा आरोळे हॉस्पिटल यांना मदतीचा हात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

विठ्ठल अण्णा राऊत यांचा आरोळे हॉस्पिटल यांना मदतीचा हात

 विठ्ठल अण्णा राऊत यांचा आरोळे हॉस्पिटल यांना मदतीचा हात


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मध्ये कोवीड रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हॉस्पिटल परिसरातील मोठे सभागृह आरोळे भावंडानी कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी देण्याचे जाहीर केले पण त्याठिकाणी स्वच्छता गृहाची व शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना सांगितले तेव्हा तहसिलदार यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलआण्णा राऊत पुढे आले व समाजबांधवांना मदतीचे आवाहन केले तेव्हा ताबडतोब शौचालय बांधकामासाठी पंधरा हजार वीट पंच्याहत्तर हजार रुपयांची हॉस्पिटल साठी दिली. यामुळे आणखी शंभर रुग्णांची सोय या ठिकाणी होणार आहे.
   यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, नंदकुमार गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव राऊत, भागवत करडकर, संजीवन मेंढकर, अशोक करडकर, सतिश पालकर, नितीन यादव, विशाल राऊत, आण्णासाहेब देशमुख, रोहिदास देशमुख, कचरू करडकर, दिगांबर सोनवणे, बाळासाहेब वाघ, प्रविण कुंभार, संजीवन कुंभार, रेवणनाथ कुंभार आदी कुंभार समाज बांधव उपस्थित होते.
   तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत बांधकामासाठी पन्नास पोते सिमेंट एक टृक खडी एक वाळू दहा पञे उपलब्ध करून दिले आहेत.
   तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा वेळी डॉ.आरोळे हॉस्पिटल मधील उभारण्यात आलेले कोवीड सेंटर मार्फत रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. डॉ. रवी आरोळे, डॉ.शोभा आरोळे व तेथील कर्मचारी रांञदिवस रूग्णांची सेवा करत आहेत. अशा परिस्थितीत कमी पडत असलेली मदत पाहता, ही बाब डॉ. रवी आरोळे यांनी 2  दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणून दिली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी येथे औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर हॉस्पिटलचे थकलेले 50 % लाईट बील आमदार रोहित पवार यांनी भरण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या 200 च्या वर रूग्ण उपचार घेत असून, नवीन हॉलमध्ये 100 रुग्णांची व्यवस्था होणार आहे. या सर्वांना सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे. जामखेडकरांनी यापुर्वीही मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. तशीच मदत यापुढे करावी असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment