जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन शिथिलतेच्या आश्वासनाची पूर्तता करावी ः आ. सुरेश धस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन शिथिलतेच्या आश्वासनाची पूर्तता करावी ः आ. सुरेश धस

 जिल्हाधिकार्‍यांनी  लॉकडाऊन शिथिलतेच्या आश्वासनाची पूर्तता करावी ः आ. सुरेश धस


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः
बीड जिल्हा लोक डाऊन संदर्भात आणण्याबाबत दिलेल्या लेखी पत्राच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे तहसीलदार रामभाऊ कदम यांनासुरेश धस यांनी पत्र दिले असून त्यात उपविभागीय अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करून लॉक डाउन शिथिल करावा अशी मागणी केली आहे.
   आष्टी शहर आणि तालुक्यातील व्यापारी छोट्या व्यवसायिक आणि हातावरील पोट असणार्‍या रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांनी लॉकडाऊन करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती याबाबत या सर्वांच्या मागणीचा विचार करून जिल्हा जिल्हा अधिकारी बीड यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून आपल्या मागणीनुसार दि.29 मार्च पासून लॉकडाऊनशिथिल करण्यात येईल असे जिल्हाधिकारी बीड यांनी कळविले होते. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी पाटोदा यांनी दिले. सर्वांनी  नियमानुसार पालन केलेले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांचे आश्वासन ना प्रमाणे मंगळवार दि. 30 मार्च पासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन नियम कशाप्रकारे शिथीलता करण्यात येणार आहे . लॉक डाऊन शिथिलता करण्याविषयी जिल्हा अधिकारी यांच्याशी समक्ष अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत सोमवार दि. 29 मार्च रोजी एक वाजेपर्यंत बैठकीचे आयोजन करावे असे पत्रकाद्वारे कळवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here