महिलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी प्राधान्यक्रम : गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

महिलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी प्राधान्यक्रम : गणेश भोसले

 महिलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी प्राधान्यक्रम : गणेश भोसले

महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावेतीन कोविशिल्ड लस देण्याचे नियोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रथम महिलांना लस देण्याचा उपक्रम जिजामाता आरोग्य केंद्रात सुरु केले आहे. दररोज या भागामध्ये 100 नागरिकांना लस दिली जाते. 60 वर्षांच्या पुढील महिला व पुरुषांना प्राधान्यक्रम दिला आहे. याच बरोबर कुणी आजारी असेल त्यांना ही लस देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती नगरसेवक गणेश भोसले यांनी दिली.
श्री भोसले पुढे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेने महिला दिनानिमित्त शहरातील महिलांचे आरोग्य सदृढ व निरोगी रहावे तसेच कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव महिलांना होवू नये यासाठी पालिकेच्यावतीने आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड लस देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिला या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुटुंबासह आपली नोकरी, रोजगार सांभाळ करीत असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे नेहमीच ते दुर्लक्ष करत असतात. त्यांचे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे
यावेळी अविनाश घुले म्हणाले की, संपूर्ण शहरामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून कोविशिल्ड लस देण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर ही लस उपलब्ध असून नागरिकांना लसीचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेविका मीनाताई मुनोत मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, डॉ. आयशा शेख व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment